शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाने यूजीसीला सादर केले नेटचे बोगस प्रमाणपत्र

By नरेश रहिले | Updated: May 24, 2023 18:49 IST

Gondia News देवरी तालुक्यातील सुरतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तात्पुरते म्हणून रुजू झालेल्या प्राध्यापकाने संस्था सचिवाच्या व जुन्या प्राचार्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून प्रकरण यूजीसीला पाठविले.

नरेश रहिलेगोंदिया : देवरी तालुक्यातील सुरतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तात्पुरते म्हणून रुजू झालेल्या प्राध्यापकाने संस्था सचिवाच्या व जुन्या प्राचार्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून प्रकरण यूजीसीला पाठविले. आपले प्राध्यापकपद कायम करण्यासाठी नेट झाल्याचे बोगस प्रमाणपत्र यूजीसीला सादर केले. त्या प्राध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्यावरही देवरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा येथील सचिव राजकुमार केवळराम मडामे (४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१२ मध्ये आरोपी तथागत प्रल्हाद गजभिये (३३) याची लिपिक म्हणून नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली. त्यानंतर सन २०१६ मध्ये आरोपी राहुल तागडे याची मराठीचे प्राध्यापक म्हणून तात्पुरती स्वरूपाची नियुक्ती केली होती; परंतु या दोन्ही आरोपींनी संस्था सचिवाला माहीत न करता खोटे कागदपत्र तयार करून स्वतःला पूर्णकालीन प्राध्यापक दाखविले. सन २०१९ मध्ये कोरोनाकाळात संस्था सचिव राजकुमार मडामे हे महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. आरोपींनी संस्था सचिवाच्या खोट्या सह्या करून प्रस्ताव विद्यापीठाला पाठविला. खोट्या सह्यांच्या आधारे स्वतःची नियुक्ती करून घेतली. आरोपीने नेटचेही प्रमाणपत्र बोगस जोडून विद्यापीठाच्या ग्रँड कमिशन यूजीसी दिल्लीकडे पाठविले. बनावट कागदपत्र पाठवून दिशाभूल करणाऱ्या तथागत प्रल्हाद गजभिये व राहुल तागडे या दोघांवर देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक घाडगे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी