शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

बांबू उद्योगासाठी बांबू क्लस्टरची निर्मिती लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:39 IST

बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप, नवेगावबांध संकुलासाठी निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : बांबू उद्योगाकरिता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारण्यात येणार आहे. या चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लवकरच घेण्यात येणार आहे. बांबू क्लस्टर निर्मितीसाठी लवकरच आवश्यक उपाय योजना करण्यात येणार असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने लाभार्थ्यांना गॅस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक एस.युवराज, सरपंच तथा वनसमितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, विजय कापगते, तहसीलदार धनंजय देशमुख, वनपरिक्षेत्राधिकारी खान, सह वनपरिक्षेत्राधिकारी तथा समिती सचिव डी.एस. सोनवाने, केवळराम पुस्तोडे, खुशाल काशिवार, महादेव बोरकर, रामदास कोहाडकर, संजय उजवने, रितेश जायस्वाल, रेशीम वनशिवार, मुलचंद गुप्ता, पं.स.सदस्य गुलाब कोरेटी, विजय अरोरा, विशाखा साखरे उपस्थित होते. बडोले म्हणाले, गॅस वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून मंजूर झालेले ४ कोटी ९९ लाख रुपयांची कामे नवेगावबांध पर्यटन विकासासाठी तातडीने सुरु करण्यात येतील. गावाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी देवून नवेगावबांधचा विकास करण्यात येईल, अशी घोषणाही या वेळी केली. नवेगावबांध संयुक्त वन व्यवस्थापन समितीला संवर्धनाकरिता गाव हद्दीतील १५३ हेक्टर जंगल सुपूर्द करण्यात येईल. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची ग्वाही, उपवनसंरक्षक युवराज यांनी दिली. या दरम्यान नवेगावबांध येथील ओबीसी प्रवर्गातील २३२ लाभार्थ्यांपैकी ५० लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. चुटीया (झाशीनगर) येथील सखाराम मंगरु परसो यांचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी सुभद्रा सखाराम परसो हिला वनविभागाच्या वतीने ७ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. निधी उपलब्ध असतानाही नवेगावबांध पर्यटन संकुल विकासाचे काम कसे रेंगाळले या विषयीची खंत रामदास बोरकर यांनी व्यक्त केली. उपस्थितांचे आभार सतिश कोसरकर यांनी मानले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले