शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आता सुटणार खड्डेमय रस्त्यांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:10 IST

तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला.

ठळक मुद्देतिरोडा व गोरेगाव नगरातील रस्त्यांसाठी १५ कोटी : विजय रहांगडाले यांनी मानले वित्तमंत्र्यांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यावर ठोक तरतुदी अंतर्गत वित्तमंत्र्यांनी १५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे आता सदर दोन्ही शहरांतील खड्डेमय रस्त्यांच्या कटकटीपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.तिरोडा नगर परिषद व गोरेगाव नगर पंचायत हद्दीतील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. ठिकठिकाणी गिट्टी निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शिवाय आता पावसाचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. अशावेळी वाहन चालकांचे अपघात घडतात. रस्त्यांवर चिखल तयार होवून रहदारी बाधित होते. सदर दोन्ही शहरांच्या हद्दीत असणाऱ्या काही रस्त्यांवरून तर पायी चालणेसुद्धा कठिण होते. मग वाहन कसे चालवावे, अशी समस्या निर्माण होते. सदर खड्डेमय उखडलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिक अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी शासन-प्रशासनाकडे करीत होते.नेमकी हीच बाब हेरून आमदार विजय रहांगडाले यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रस्ते दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली.यावर वित्तमंत्र्यांनी त्वरित ठोक तरतुदी अंतर्गत गोरेगाव नगर पंचायतकरिता १० कोटींचा निधी दिला. तसेच तिरोडा नगर परिषद क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीकरिता ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरांतील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येईल व नागरिकांना रहदारीयोग्य रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे तिरोडा शहर व गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातील रस्त्यांच्या स्थितीमध्ये चांगला सुधार घडून येईल व नागरिकांच्या रहदारीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, असे आ. रहांगडाले यांनी सांगितले. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आ. रहांगडाले यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारVijay Rahangdaleविजय रहांगडाले