शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जनसंवाद कार्यक्रमातून उलगडणार शेतकऱ्यांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:54 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.

ठळक मुद्देसर्व विभागाच्या समन्यवयातूून उपक्रम : पुढील आठवड्यापासून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून आहे. तसेच जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यानंतरही कृषी क्षेत्रात जिल्ह्याची फारशी प्रगती झाली नाही. जिल्ह्यातील कृषी निगडीत सर्वांगिन विकास साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. मात्र त्यांचे वेळीच निराकरण केले जात नाही. त्यामुळे शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. मात्र जिल्ह्यात कृषी विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावून आणि शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यासाठीच जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल, कृषी, सिंचन आणि सर्व विभागाचे कर्मचारी निवड केलेल्या गावात एक दिवस जावून शासनाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. तसेच त्यांच्या समस्यांचा सुध्दा वेळीच निपटारा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यात येणार आहे. लवकरच गावाची निवड केली जाणार असून प्रत्येक आठवड्यातून निवड केलेला गावात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.नो वर्क नो पे चा नियम लागू करणारजिल्ह्यातील बहुतेक विभागाचे अधिकारी कर्मचारी दररोज नागपूर व इतर ठिकाणाहून अपडाऊन करतात. त्यामुळे ते कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. अधिकारी व कर्मचाºयांच्या अपडाऊन संस्कृतीला आळा घालण्यासाठी बॉयामेट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आली असून लवकरच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. तसेच यानंतरही सुधारणा न झाल्यास नो वर्क नो पे यानुसार त्यांचे वेतन कपात केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सांगितले.