शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५८३ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा ...

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ५८३ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भूवैज्ञानिकांनी निरीक्षण विहिरींवरून ही बाब पुढे आली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. यांतर्गत भूवैज्ञानिक जिल्ह्यात निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीची पाणी पातळी मोजून हा आराखडा तयार करीत असतात. २४ फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८३ गावांमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यात ४४२ मोठी गावे, तर १३१ लहान गावांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

......

या करणार उपाययोजना

पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी २२३ बोअरवेलचे खोदकाम, ११९६ बोअरवेलची दुरुस्ती, १४६ विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. तसेच ७६ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर सहा खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

......

मार्चनंतर पाणीटंचाईच्या समस्येत होणार वाढ

जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाईची फारशी समस्या जाणवणार नाही. मात्र, एप्रिल ते जूनदरम्यान काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट हाेऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.

.......

असा तयार केला जातो पाणीटंचाईचा आराखडा

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठाअंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा आणि एप्रिल ते जून तिसरा टप्पा, असा आराखडा तयार केला जात असल्याचे भू-वैज्ञानिक शिरीष बागडे यांनी सांगितले.