शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निकालातही खासगी शाळा वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:10 IST

महिनाभरापूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात कित्येक खाजगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला. मात्र नगर परिषदेच्या एकाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला नाही. नगर परिषद व शासनाकडून या शाळांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देएकाही शाळेचा निकाल १०० टक्के नाही : लाखो रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिनाभरापूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात कित्येक खाजगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला. मात्र नगर परिषदेच्या एकाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला नाही. नगर परिषद व शासनाकडून या शाळांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र यानंतरही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत नसल्याने या खर्चावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.दहावीच्या परीक्षेत एकेवेळी बोर्डाचे टॉपर देणारी शाळा म्हणून नगर परिषदेची म्युनिसिपल हायस्कूल ओळखले जात होते. कालांतराने मात्र नगर परिषदेच्या या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. १०० टक्के तर सोडाच मात्र ९० टक्केच्यावर निकाल देण्यात या शाळा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे पालकांचा कल आता खाजगी शाळांकडे वाढला असून नगर परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्यास इच्छुक नाहीत. खाजगी शाळांतील नाममात्र पगारावर काम करणारे शिक्षक त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के देत आहेत. तर उलट गलेलठ्ठ पगार घेऊनही पालिकेच्या शाळांतील शिक्षक मात्र अपयशी ठरत आहेत. अशात खाजगी शाळांमधील कमी पगारावर काम करणारे शिक्षक जास्त गुणवंत असल्याचे बोलले जात आहे. शासन व पालिकेकडून शाळांवर लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य सुविधा दिल्या जात आहेत. पण यानंतरही नगर परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नगर परिषदेच्या शाळांसारखीच होती. जिद्द व चिकाटीमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांना टक्कर देत आहेत. मात्र नगर परिषदेच्या शाळांची स्थिती आहे तीच आहे. पटसंख्या बोटावर मोजण्या इतकी असून तेवढ्या विद्यार्थ्यांकडूनही पाहिजे तसा निकाल देण्यास शिक्षक अपयशी ठरत आहे. अशात भविष्यात नगर परिषदेच्या शाळांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मुलींनी मारली बाजीनगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा शहरात आहेत. यात येथील एस.एस.गर्ल्स शाळेने सर्वाधीक ८८ टक्के निकाल देऊन बाजी मारली आहे. म्युनिसीपल हायर हायस्कूलने ८३ टक्के निकाल दिला आहे. म्युनिसिपल लोअर हायस्कूलचा ८२ टक्के तर रामनगर म्युनिसीपल शाळेचा ६२ टक्के निकाल आहे. माताटोली शाळेचा ५० टक्के निकाल लागल्याची माहिती आहे. कधी बोर्डाचे टॉपर देणारी म्युनिसिपल हायर हायस्कूल मात्र आता निकालांत माघारली आहे.बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थीनगर परिषद शाळांतील निकालाची ही स्थिती बघता शाळांत शिक्षणाची काय गत आहे हे दिसून येते. त्यामुळे पटसंख्येची स्थिती ही यापासून वेगळी नाही. यातून पालिकेच्या शाळांची स्थिती किती गंभीर आहे याची प्रचिती येते. पालिकेच्या या स्थितीला नगर परिषद प्रशासन व पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी दम लावल्यास नगर परिषद शाळांना गतवैभव लाभणार यात शंका नाही.

टॅग्स :Schoolशाळा