शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:53 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमहाऑनलाईनवर डॉटा होणार अपलोड

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने १ फेब्रुवारी घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना याच आधारावर त्या करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता व त्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यात जमा केली जाणार असून याचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केला जाणार आहे. त्यानंतर दुसरा हप्ता एप्रिल व तिसरा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असून मार्च महिन्यात केव्हाही आचार संहिता जाहीर होवू शकते. त्यामुळे त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा व्हावा, यासाठी सरकारची धावपळ सुरू आहे. यासाठीच त्यांनी महसूल, कृषी आणि सहकार विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. पुढील पंधरा दिवस सर्व कामे बाजुला ठेवून २ हेक्टरपर्यंत खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन त्याची गावपातळीवर छाननी करण्याचे निर्देश दिले आहे. याद्या तयार झाल्यावर त्यांचे १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाव पातळीवर वाचन सुध्दा केले जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत या याद्या थेट शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. सर्व डॉटा अपलोड झाल्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळावा, यासाठी याद्या तयार करताना कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि त्यांचे अठरा वर्षाखालील मुले असे गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे शेतीचे वेगवेगळे सातबारा असले तरी एकाच कुटुंबात राहत असल्याने वरील सुत्राप्रमाणेच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.छत्तीसगड,मध्यप्रदेशच्या पूर्वी मदत देण्याचा प्रयत्नमध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या योजनेचा लाभ मिळण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार जमा करुन त्याचा निवडणुकीत लाभ मिळवून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे शासकीय यंत्रणेला या कामासाठी युध्द पातळीवर कामाला लावण्यात आले आहे.

१ फेब्रुवारी २०१९ नंतरच्यांना लाभ नाहीकेंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा १ फेब्रुवारी २०१९ ला केली. त्यामुळे यानंतर २ हेक्टरपर्यंतचे सातबारा तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर शेती आहे त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहे.

रविवारी सुरू राहणार कामेकेंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केवळ निवडणुकीत लाभ मिळवून घेण्यासाठीच केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. त्यामुळेच रविवारी सुटी असली तरी या दिवशी याद्या तयार करण्याचे काम सुरू राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :Governmentसरकार