शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 01:02 IST

मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नसल्याने येथील नगर परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर आला आहे.

दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही : पालिकेच्या प्राथमिक शाळा अडचणीत गोंदिया : मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नसल्याने येथील नगर परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर आला आहे. परिणामी नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती गंभीर असून विद्यार्थी पटसंख्या घसरत चालली आहे. असे असतानाही शासन तसेच पालिका प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. खासगी शाळांपुढे नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळा टिकत नसल्याचे दिसून येते. यात मात्र जिल्हा परिषदेकडून याची दखल घेत प्रयत्न सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून आता खाजगी शाळांना टक्कर देऊ लागल्या आहेत. यात मात्र नगर परिषदेच्या शाळांसाठी स्थान राहिलेले नाही. कारण पालिकेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मोजकेच विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद करण्याची पाळी नगर परिषदेवर आली आहे. या मागचे कारण असे की, शासन तसेच नगर परिषद प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. डी.एस.मदारकर यांची ३१ आॅगस्ट २०१२ मध्ये सेवानिवृत्ती झाल्या नंतर पासूनच हे पद रिक्त पडून आहे. यावर १४ सप्टेंबर २०१२ पासून प्रशासन अधिकाऱ्यांचा प्रभार तिरोडाचे एस.एस. ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडे तिरोडाचा कारभार व येथील प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार असल्याने त्यांची गोची होत होती. परिणामी ते आठवड्यातून काही दिवस येथे येत होते. अशात एक ना थड भाराभर चिंध्या हीच गत प्राथमिक शिक्षण विभागाची झाली होती असे बोलणे वावगे ठरणार नाही. अशात ३१ मे २०१५ रोजी ठाकरे यांचीही नागपूरला बदली झाी. त्यामुळे विभागाकडे प्रशासन अधिकारीच नसल्याने विभागाचा कारभार रेटला जात आहे. यामुळे मात्र पालिकेच्या प्राथमिक शाळांची गत दयनीय झाली आहे. विभागाच्या कारभारावर जातीने लक्ष ठेवायला अधिकारीच नसल्याने पालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. परिणामी पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये बोटांवर मोजण्याइतके विद्यार्थी असल्याने शाला आॅक्सीजनवर आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)शिक्षण उपसंचालकांना दिले पत्र प्रशासन अधिकारी देण्यात यावा या मागणीचे पत्र शिक्षण विभागाकडून २७ मे रोजी शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले. यापूर्वीही प्रशासन अधिकाऱ्यांची मागणी करण्यात आली. मात्र त्याचा काहीच फायदा मिळाला नाही. अशात प्राथमिक शाळांचा दर्जा वाढावा, विद्यार्थी पटसंख्या वाढावी यासाठी धडपडणारा कुणीच नाही. बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी पालिकेच्या १७ प्राथमिक शाळा आहेत. मात्र या शाळांत मागील वर्षी बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून विद्यार्थी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यात काही सुधारणा झाली असावी असा काहीसा प्रकार दिसून येत नसून आहे तीच स्थिती या शाळांची आहे. अशात पालिकेवर शाळांना बंद करण्याची पाळी येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.