शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या हस्ते रहांगडालेचा यांचा गौरव

By admin | Updated: August 15, 2016 00:33 IST

बोंडगावदेवी : नागपुर वनवृत्ता अंतर्गत गोंदिया वन विभागातील अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल छगनलाल रहांगडाले यांचा

बोंडगावदेवी : नागपुर वनवृत्ता अंतर्गत गोंदिया वन विभागातील अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल छगनलाल रहांगडाले यांचा वन, वन्यजीव व्यवस्थापन कार्यात बहुमोल कामगीरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. सन २०१४-१५ वर्षासाठी राज्यस्तरावर वन, वन्यजीव व्यवस्थापन कार्यक्रमात भरीव योगदान देऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनक्षेत्रपाल या संवर्गातून पुणे येथील यशदाच्या सभागृहात आयोजित समारंभात राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते सुवर्ण पदक, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वनराज्यमंत्री राजे अम्बरीश आत्राम, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान वनसंरक्षक सर्जन भगत उपस्थित होते. संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम, मित्र रोपवनास राज्यस्तरीय द्वितीय, तृतीय पुरस्कार मडेघाट, धाबेटेकडी, तिडका या गावांना पुरस्कार मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कौतुक गोंदियाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, परिविक्षाधिन सीडीएफ राहुल पाटील, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी.उदापुरे यांनी केले आहे. (वार्ताहर)