शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

तंटामुक्तीचे अध्यक्षच काढतात मोहिमेचा अनर्थ

By admin | Updated: August 3, 2014 23:28 IST

महाराष्ट्र शासनाने गावातील क्षुल्लक तंटे पोलीस ठाणे किंवा न्यायालयापर्यनत जाऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. मात्र या मोहीमेचा मर्म न ओळखता आपल्याला गावातील सर्व भांडण तंटे

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने गावातील क्षुल्लक तंटे पोलीस ठाणे किंवा न्यायालयापर्यनत जाऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. मात्र या मोहीमेचा मर्म न ओळखता आपल्याला गावातील सर्व भांडण तंटे सोविण्याचा व त्या तंट्यांवर निर्णय देण्याचा अधिकार मिळाला असा चुकीचा अर्थ काढून अनेक तंटामुक्त अध्यक्ष फौजदारी प्रकरणांना छेडतात. यामुळे पोलिसांच्या व न्यायालयाच्या कामात ढवळाढवळ होते.गंभीर स्वरूपाच्या तंट्यांना हाताळण्याचा अधिकार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ आॅगस्ट २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या मोहीमेचा उद्देश गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्याचा आहे. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविले जावे. वादामुळे दोन्ही पक्षाचा वेळ व पैश्याचा अपव्यय होते. पोलिस व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा भार वाढतो. हे होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली. या मोहिमेने राज्यात आमूलाग्र बदल घडून आला. राज्जातील लाखो तंटे एकाच वर्षात सामोपचाराने सोडविण्यात आले. परंतु काही समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी शासन निर्णयाचा बरोबर अभ्यास न करता तंटामुक्त मोहीम गावातील आपल्याला सर्वच प्रकारचे तंटे सोडविण्याचा अधिकार आहे, असा चुकीचा अर्थ काढून गावातील फौजदारी व गंभीर प्रकरणांना हाताळतात हे चुकीचे आहे. लहान-लहान तंट्यांचे मोठ्या वादात पर्यावसान होऊ नये यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहीमेचा चांगला उद्देश पाहून लोकचळवळ उभी झाली.गावातील दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर तंटे सोडविल्या जाऊ लागले. गावातील तंटे सोडवून नागरिकांच्या पैश्याची व वेळेची बचत होऊ लागल्याने तंटामुक्त अध्यक्षाला गावात सन्मानाचे स्थान मिळू लागले. परंतु याचा फायदा घेत अनेक तंटामुक्त अध्यक्षांनी शासन निर्णयाचा योग्य अभ्यास न करता फौजदारीच्या कलम ३२० अंतर्गत असलेल्या सीआरपीसीमध्ये वर्गीकृत तंट्यांनाही हाताळले. तंटामुक्त समितीने लहान मारामारी, कुंपनाचे वाद, शेतीचे वाद व वैनमस्य हे प्रकरणे मिटविण्यासाठी गावात दोन्ही पक्षाला एकत्र बोलावून त्यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या वादात दोन्ही पक्षातील एक पक्ष तयार नसला तर तो वाद तंटामुक्त गाव समिती सोडवू शकत नाही. परंतु अनेक तंटामुक्त अध्यक्षांनी आपल्याला जणू तंट्यांवर निर्णय देण्याचा अधिकारच मिळाला असे गृहीत धरून अनेक प्रकरणात निर्णय देण्याचा प्रयत्न केला. या तंटामुक्त अध्यक्षांमुळे पोलिसांच्या कामात अडचण झाली. खून, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी अश्या तंट्यांना न्यायालयात चालविणे आवश्यक आहे. परंतु काही समित्यांनी अश्या प्रकरणांना आपल्याकडे घेतल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)