शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी १.३५ लाख खड्डे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 01:32 IST

शासनाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस बांधला. त्यानुसार या वृक्ष लागवडीच्या कामात ग्राम पंचायतपासून सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

१ जुलैचा मुहूर्त : १.७० हजार झाडे लावणारगोंदिया : शासनाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस बांधला. त्यानुसार या वृक्ष लागवडीच्या कामात ग्राम पंचायतपासून सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख ३५ हजार खड्डे तयार झाले असून या उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मंगळवार दि.२१ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली.एकाच दिवशी जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ७९३ रोपटे लावण्यात येणार आहेत. ५५१ ग्राम पंचायतच्या माध्यमातून ५५ हजार १०० रूपटे लावण्याचे उद्दीष्टे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ग्राम पंचायतींनी आतापर्यंत ६२ हजार ३३५ खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यात ६३ ग्राम पंचायतींना ६३०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. या तालुक्यात ६ हजार ३५४ खड्डे खोदण्यात आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७० ग्राम पंचायतींना ७ हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. या तालुक्यात ११ हजार १२१ खड्डे खोदण्यात आले आहेत. देवरी तालुक्यात ५५ ग्राम पंचायतींना ५५०० रोपटे, गोंदिया तालुक्यात १०९ ग्राम पंचायतींना १० हजार ९०० रोपटे, गोरेगाव तालुक्यात ५५ ग्राम पंचायतींना ५५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. सालेकसा तालुक्यात ४२ ग्राम पंचायतींना ४२०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट्य आहे.इतर विभाग १ लाख १४ हजार रोपटे लावणारवृक्षारोपणासाठी प्राथमिक शिक्षण विभागाला ५० हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्टे आहेत. त्यासाठी २५ हजार ४४ खड्डे खोदण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला ५० हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्टे आहेत. त्यासाठी ३५ हजार खड्डे, महिला बालकल्याण विभागाला ३३५८ रोपट्यांसाठी ३३५८ खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाला ३८०० रोपट्यांसाठी ९४० खड्डे खोदण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाला १०३० रोपट्यांचे उद्दीष्ट असून १०३० खड्डे खोदले, आरोग्य विभागाला २०२५ रोपट्यांचे उद्दीष्ट असताना २२४० खड्डे खोदण्यात आले आहेत.