शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाची तयारी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:14 IST

गणेशोत्सव आता अंतिम टप्यात असून नवरात्रोत्सव आता काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमृूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त : मंडप उभारणीचे काम जोमात, २१ तारखेला होणार मातेचे आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गणेशोत्सव आता अंतिम टप्यात असून नवरात्रोत्सव आता काही दिवसांवरच आले आहे. त्यातही गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती असून शहरात उत्सवाची तयारी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. गणरायाला निरोप देऊन मूर्तिकार आता दुर्गामातेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांकडून मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या २१ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वांनाच तिच्या आगमनाची प्रतिक्षा लागली आहे.राज्याच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाची धूम काही औरच असते. यामुळेच येथील नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती आहे. या प्रसिद्धीमुळेच मध्यप्रदेश व छत्तीसगडसह दूरवरून भाविक येथील उत्सवाची भव्यता बघण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात गोंदियात येतात. त्यामुळेच येथील उत्सवाची भव्यता दरवर्षी वाढतच चालली आहे. हजारोंच्या संख्येत नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक गोंदियात येत असल्याने या नऊ दिवसांत शहर गजबजलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामाता विराजमान राहत असल्याने हे दिवस नवचैतन्याने भरलेले असतात.येत्या २१ तारखेला घटस्थापना असून मातेचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक बनावे यासाठी मंडप उभारणी जोमात सुरू आहे.त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सवाची शहरासह परिसरात ख्याती असल्याने त्यांचे काम जोमात सुरू आहे. शिवाय मुर्तीकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मुर्ती तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त दिसून येत आहेत. शिवाय मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले आहेत.कोलकाताचे मूर्तिकार शहरात दाखलदुर्गा मातेच्या मुर्ती शहरातील मुर्तीकार बनवित असतात. मात्र गोंदियातील दुर्गा उत्सवाची ख्याती लक्षात घेत कोलकातातील मुर्तीकार शहरात दाखल झाले आहेत. सिव्हील लाईन्स परिसरातील रेल्वे क्वार्टर परिसरात हे मुर्तीकार आले असून त्यांनी मुर्ती तयार करण्यास सुरूवात केली आहे. गोंदियातील त्यांचे हे चौथे वर्ष असल्याचे मुर्तीकार सपन मैती यांनी सांगीतले. यावर्षी सध्या तरी त्यांच्याकडे १०-१२ मुर्तींचे आॅर्डर असून ते आपल्या परिवारासह दुर्गा मातेची मुर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.साहित्यांची दुकाने सज्जदुर्गामातेच्या श्रृंगारासाठी लागणारे दागिने, शस्त्र व अन्य साहित्यांची दुकाने सज्ज झाली आहेत. आता काही दिवस मातेच्या आगमनासाठी उरलेले असल्याने व ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी मंडळांकडून आतापासूनच सामानाची खरेदी केली जाते. त्यामुळे दुकानदारांनी मातेला लागणारे साहीत्य मागवून ठेवले असून दुकान सज्ज करून ठेवले आहे. तर दुकानांतही आतापासून गर्दी दिसून येत आहे.