शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याच्या जाचाला कंटाळून गर्भवतीने विष प्राशन केले

By admin | Updated: May 24, 2017 01:43 IST

सासऱ्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका गर्भवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सासऱ्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका गर्भवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या महिलेला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शिल्पा अरुण दास (१९) रा. अरुणनगर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या अरुणनगर (कोरंभीटोला) येथील शिल्पा अरुण दास ही महिला पती व सासू सासऱ्यासोबत चंद्रपूर येथे कामानिमित्त गेले होते. दोन दिवसापूर्वी अरुणनगर येथे ते परतले. शिल्पा सासरा तिचा छळ करीत असल्याने पुन्हा चंद्रपूर जाणे शिल्पाला आवडत नव्हते. अरुणनगर येथे माहेर व सासर दोन्ही असल्याने शिल्पा अरुणनगर येथे राहणे पसंत करीत होती. तिच्या पोटात २० आठवड्याचे बाळ असल्याने समोर प्रसूतीची वेळ येणार असल्याचे पाहून शिल्पाने चंद्रपूरला जाण्यास नकार दिला. परंतु सासऱ्याकडून नेहमीच तिला त्रास होत असल्याने ती कंटाळली. तिचे माहेर गावातच असल्याने आईकडे आलेल्या शिल्पाने पोटात असलेल्या गर्भाचाही विचार न करता शेतात फवारणी करण्यासाठी आणून ठेवलेले किटकनाशक मंगळवारच्या सकाळी १०.३० वाजता प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती तिच्या आईला मिळताच तिच्या आईने चिंच व निंबूचे पाणी तिला पाजून उलट्या करण्यास बाध्य केले. अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर गंगाबाई स्त्री रुग्णालयात त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात तिला दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोटात जागा दिली, घरात देणार नाही का?सासऱ्याकडून जर त्रास होत असेल तर जीव देण्याचा विचार का करतेस मी तुला माझ्या पोटात जागा दिली तर छळामुळे घरात जागा देणार नाही का? असा सवाल शिल्पाच्या आईने तिला करीत अशी चूक आयुष्यात करायची नाही, अशी समज दिली. घटनेची माहिती देताना शिल्पाच्या आईला अश्रृ अनावर झाले.