शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

झटू सर्व भावे, करू स्वर्ग गावा..!

By admin | Updated: June 8, 2014 00:00 IST

आदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा

गुरूदेव सेवक ठाकूर गुरूजी : २३0 गावांत सेवा मंडळाच्या शाखा स्थापननरेश रहिले - गोंदियाआदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा उत्तम मार्ग ग्रामगीतेतून सांगितला. या ग्रामगीतेची वाणी प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी ६८ व्या वर्षीही ठाकूर गुरूजी तेवढय़ाच उत्साहाने धडपडत आहेत. नि:स्वार्थपणे पुढील पिढीवर योग्य संस्कार घडविण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्याच तोंडून जाणून जाणून घेतलेली ही माहिती.गोंदियातील जे.एम. हायस्कूल सिव्हील लाईन शाखेत शिक्षक म्हणून ठाकूर गुरूजींनी काम केले. शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थी घडविणे, त्यांना आदर्श नागरिक बनविणे हा त्यांचा स्वभावगुण होता. विद्यार्थ्याना आदर्श नागरिक घडविण्याच्या  तळमळीतूनच त्यांनी सेवानवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. ‘तन-मन से गाऊंगा तेरा भजन, ऊँचा उठा दे मेरा प्यारा वतन,’ हे राष्ट्रसंतांचे भजन गात गावागावांत गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन करण्यावर जोर दिला. नोकरी पेशा करणारे व्यक्ती सेवानवृत्तीनंतर आराम करण्यास पसंत करतात. मात्र ‘आराम हराम है’ या युक्तीला अंगीकारून त्यांनी  समाजकार्यात वाहून घेतले. याबद्दल सांगताना ते म्हणतात, सेवाभावातूनच ईश्‍वर भक्ती होते. राष्ट्रसंतांचा विज्ञानवादी दृष्टिकोन पुढे ठेवून भजनाच्या माध्यमातून गावागावात राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा अर्थबोध समाजाला करवून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. लोकांनी यावे, गुरूदेव सेव मंडळाशी जुळाले आणि त्यांचे तत्व अंगीकाराने असा प्रयत्न असतो. अनेकांना हे पटते. त्यातूनच जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक लोकांना गुरूदेव सेवा मंडळाशी जुळवण्यात यश आल्याचे गुरूजींनी सांगितले.सद्यस्थितीत समाजात दारू, जुगार, खर्रा, गुटखा, तंबाखू अशी वाईट व्यसने समाजाला लागली आहेत. या व्यसनामुळे येणारी पिढी नैराश्याच्या खाईत लोटत चालली आहे. त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी व सन्मार्गाला लागण्यासाठी तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या भजनांचा आधार घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांच्या शोषणावर आवाज उठविताना हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार यावर प्रबोधन करीत हुंडा देऊ नका, मागू नका, स्त्रीयांचा सन्मान करा अशी आर्त हाक ते समाजाला देत आहेत. त्यासाठी ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी नमुद केलेल्या ओव्यांमधून ते समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणांनी आळशी न होता, आणि उच्च शिक्षणाचा आव न दाखविता आपल्या शेतीला पडीक ठेऊ नये. उच्च शिक्षण घेऊनही शेतीत नांगर पकडायची लाज वाटू देऊ नका, गोपालन करा असे ठाकूर गुरूज सांगतात. शेतीच्या कामाकडे हल्ली दुर्लक्ष करण्यात आले. शेतीच्या कामात करावी लागणारी मेहनत आजच्या तरूणांना परवडण्यासारखी वाटत नसल्याने शेतीसाठी मानसे मिळत नाही.  त्या शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यागेल्याने बेरोजगारीत वाढ झाली. शेती न पिकविता मजूरीसाठी शहरात पलायन करणार्‍या मजूरांना राष्ट्रसंताच्या भजनाची आठवण करून दिली. ‘सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबे ना कोणी, उटला सुटला नोकर होतो, पैश्यासाठी लोभानी’ ही परिस्थिती समाजाची असल्याचे ते म्हणाले.मी नवव्या वर्गात असताना आमगावच्या गुरूदेव टेकडीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते. त्यांच्या कीर्तनाने माझे अंतरंग बदलले. त्यानंतर मी वंदनीय महाराजांच्या ‘लहरकी बरखा’ या पुस्तकातील २५0 श्लोक पाठांतर केले. त्या ोकांचा वक्तृत्वात भर पाडण्यास मदत झाली. आपल्या पेंशनमधील महिन्याकाठी ३ हजार रूपये राष्ट्रसंताच्या प्रचारासाठी आता खर्च करीत आहे. माझे चित्त, देह, भान राष्ट्रसंताच्या साहित्याच्या प्रचारासाठी आहे. त्यांच्या ग्रामगीतेतून आदर्श गावाची संकल्पना राबविण्यास आता महाराष्ट्र शासनही सरसावले, याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.‘खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो देह कार्यी पडू दे,घडू दे प्रभू, एवढे हे घडू दे’ हे लक्षात ठेवून आपण गावाला स्वर्गासारखे करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ठाकूर गुरूजी म्हणाले.