शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची ५० लांखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.

ठळक मुद्देगोंदिया व भंडारा जिल्ह्याला प्रत्येकी २५ लाख : नागरिकांनी सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण जगभरात कोरोनामुळे महामारीचे संकट निर्माण झाले आहे. तर महाराष्ट्रात सुध्दा दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासन व गोंदिया आणि भंडारा जिल्हा प्रशासन आवश्यक उपाय योजना करीत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाविरुध्द लढण्यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची केली आहे. यासंबंधीचे पत्र देखील त्यांनी गोंदिया व भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.संपूर्ण देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोना विरुद्ध लढा देत आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासन आणि प्रशासनसमोर देखील पेच निर्माण झाला आहे.राज्य शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज आवश्यक त्या उपाय योजना करीत आहे. मात्र नागरिकांनी सुध्दा शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनारुपी संकटाला नागरिकांनी सयंमाने तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.कोरोना विरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे.त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.देश आणि राज्यावर आलेल्या कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक, धार्मिक, सेवाभावी संस्थांनी सुध्दा आवश्यकता पडल्यास मदतीसाठी पुढे यावे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात आहे. मात्र याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस व सफाई कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे सुध्दा त्यांनी आभार मानले आहे.विशेष म्हणजे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील प्रत्येक घडामोंडीवर माजी आ.राजेंद्र जैन हे लक्ष ठेवून असून त्यांनी सुध्दा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसprafull patelप्रफुल्ल पटेल