शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:37 IST

बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले.

ठळक मुद्देमचान निरीक्षणात ३५३ रानगव्यांची नोंद : वाघोबाचे दर्शनच झाले नाही

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले. व्याघ्र राखीव क्षेत्रात तीन ठिकाणांवरून करण्यात आलेल्या निरीक्षणात सर्वाधिक ३५३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. यावरून व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगवेच जास्त असल्याचे स्पष्ट होते.गोंदिया जिल्हा जंगलांचा जिल्हा असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हे जिल्ह्याला लाभलेले वरदानच आहे. व्याघ्र राखीव क्षेत्रामुळे जिल्ह्याची राष्ट्रीयच काय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा ख्याती आहे.वाघोबा सह अन्य वन्यप्राण्यांचे वस्तीस्थान असलेल्या या व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटक मोठ्या आशाने वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी येतात. या राखीव क्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या मोठी असताना नेमका त्याचा अंदाज घेणे सुद्धा गरजेचे असल्याने दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात प्राणी गणना केली जाते. त्यालाच निसर्गानुभव मचान निरीक्षण म्हटले जात असून मचानवरून प्राण्यांना टिपून त्यांची नोंद घेतली जाते.त्यानुसार, यंदा १८ मे रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात निसर्गानुभव मचान निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणात सर्वाधीक ३५३ रानगव्यांची नोंद करण्यात आली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर १९८ माकड व तिसºया क्रमांकावर १७५ रानडुकरांची नोंद करण्यात आली. या तीन वन्यप्राण्यांना सोडून अन्य प्राण्यांची शंभराच्या आतच नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, वाघोबाचे वस्तीस्थान असताना निरीक्षणात वाघोबा दिसलेच नसून फक्त चार बिबट दिसल्याची नोंद आहे.नवेगावबांध पार्कमध्ये वन्यप्राण्यांचा अधिक वावरयंदा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत उमरझरी,पिटेझरी व नवेगावपार्क येथे निसर्गानुभव मचान निरीक्षण करण्यात आले व त्यात एकूण ९८७ वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.यात उमरझरी येथे ३४३, पिटेझरी येथे ६२ तर नवेगाव पार्क येथे सर्वाधीक ५८२ वन्याप्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येथेच २८६ रानगव्यांची नोंद घेण्यात आली असतानाच उमरझरी येथे चार बिबट्यांची नोंद घेण्यात आली आहे.निरीक्षणात या वन्यप्राण्यांचे दर्शननिरीक्षणात वाघोबाचे दर्शन कुणालाच झाले नाही. मात्र बिबट-चार, अस्वल- ४०, चांदी अस्वल- एक, रानकुत्रे- ३४, खवल्या मांजर-पाच, मुंगूस- तीन, मसण्या उद- सात, रान मांजर-आठ, सापाळ(सारई)- नऊ, रानडुकर- १७५, रानगवा- ३५३, चितळ-२२, हरिण- एक, निलगाय-२६, सांबर-४३, भडकी- एक, ससा-तीन, लंगूर (वानर)- तीन, माकड-१९८, मोर-३९, उदमांजर-चार, घार-सहा, घुबड-एक तर एक सुतार दिसून आले आहे.

टॅग्स :forestजंगल