शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

लोकसभेसाठी ११ एप्रिल रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:33 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू : जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार मतदारांसाठी १२८१ केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आंदर्श आचारसंहिता रविवारपासून (दि.१०) लागू झाली असून गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० लाख ७५ हजार ९३६ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख २६ हजार २९४ पुरुष तर १ लाख २३ हजार ९६४ महिला व इतर १ असे एकूण २ लाख ५० हजार २५९ मतदार आहेत. (६४) तिरोडा विधानसभा क्षेत्रात १ लाख २४ हजार ५९१ पुरुष तर १ लाख २६ हजार ५९८ महिला असे एकूण २ लाख ५१ हजार १८९ मतदार आहेत. (६५) गोंदिया विधानसभा क्षेत्रात १ लाख ५३ हजार ४२० पुरुष तर १ लाख ५९ हजार १७१ महिला असे एकूण ३ लाख १२ हजार ५९१ मतदार असून (६६) आमगाव विधानसभा क्षेत्रात १ लाख ३१ हजार ४१० पुरुष तर १ लाख ३० हजार ४८७ महिला असे एकूण २ लाख ६१ हजार ८९७ मतदार मतदार आहेत.एकंदर जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार ७१५ पुरुष तर ५ लाख ४० हजार २२० महिला मतदार तर इतर १ असे १० लाख ७५ हजार ९३६ मतदार असून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी १ हजार २८१ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. यात, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ३१६, तिरोडा २९५, गोंदिया ३६० व आमगाव ३१० मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले आहे.महाराष्ट्रात चार टप्यात होणाऱ्या निवडणुकीत ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया व गडचिरोली या क्षेत्राची निवडणूक होणार आहे. अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.निवडणुकीत गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.यादीत नाव असणे आवश्यकज्या मतदारांकडे मतदान कार्ड आहे परंतु त्यांचे नाव मतदार यादीत नसेल अशांना मतदान करता येणार नाही. यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या यादीतून करुन घ्यावी, नाव नसेल तर यादीत नाव आणण्यासाठी वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करीत १९५० या टोलफ्री क्रमांकावर आपल्या शंका मतदार नोंदवू शकतात व त्यांच्या शंकाचे समाधान करण्यात येईल असे डॉ. बलकवडे यांनी सांगीतले.मतदान केंद्रावर विशेष सुविधामतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. उन्हाचे दिवस असल्यामुळे मतदान केंद्रावर लांब रांग असेल त्या ठिकाणी शेडची सोय, अपंगासाठी व्हीलचेअर किंवा वाहनांची सोय करण्यात येणार आहे.मतदारांची भर पडणार१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार, जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ मतदार आहेत. मात्र ज्यांची नावे सुटली आहेत त्यांना संधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ व २३ फेब्रुवारी रोजी तसेच २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. त्यातही मतदारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे मतदारांची भर पडणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक