शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे जिल्ह्यात दिवाळीनंतर राजकीय धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. तेव्हापासून जि.प. वर प्रशासक नियुक्त आहे. तर आता गोंदिया, तिरोडा नगर परिषदेसह चार नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यातच चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून दिवाळीनंतर जिल्ह्यात राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विशेष महत्त्व असून पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना सर्व प्रमुख पक्षांचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर राहणार आहे. यामुळेच सध्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहे. दिवाळी मिलन, सभा, बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन निवडणुकीपूर्वीची वातावरण निर्मिती केली जात आहे. सर्वात आधी पुढील महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर पकड मजबूत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. त्या पाठोपाठ पुढील महिन्यातच नगर परिषद आणि नगर पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असल्याने व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हा परिषदेच्या लांबलेल्या निवडणुकासुद्धा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील दोन महिने जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहेत. 

युती, आघाडीवर चर्चानंतर, सध्या जनसंपर्कावर भर - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर हेच चित्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कायम राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपनेसुद्धा आंदोलने, मेळावे घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यास सुरुवात केली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सभा बैठकांमध्ये त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. - दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाचे पक्षाचे पदाधिकारी व सदस्य जोमाने कामाला लागले आहे. - विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मागील वर्षभरापासून शिवसेनेने जिल्ह्यात कार्यकर्ते मेळावे आणि विविध कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. - मुकेश शिवहरे,  जिल्हा सहसंपर्क प्रमुख

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघडण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला याचा निश्चितच फटका बसेल.- केशव मानकर, जिल्हाध्यक्ष भाजप 

 

टॅग्स :Electionनिवडणूक