शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शचा १२ तासात लावला पोलिसांनी शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:42 IST

अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली.

ठळक मुद्देअपहरणाचा संशय : रेल्वे स्थानकाजवळ सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली.प्राप्त माहितीनुसार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय वसाहतीत राहणारा आदर्श महानंदे हा येथील बीएडी विद्यालयात ६ व्या वर्गात शिकत आहे. तो सोमवारी (दि.१८) सकाळी ७.३० वाजता शाळेत गेला मात्र तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्याची आई रंजीता महानंदे यांनी त्याचा गावात आजूबाजूच्या गावात शोध घेतला. पण तो सापडला नाही. शेवटी मध्यरात्री रंजीता व तिचे पती राजा यांनी १२ वाजता नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे त्यांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपराध क्रमांक २७/२०१९ कलम भादंवि ३६३ अन्वये तक्रार नोंदविली. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले पोलीस हवालदार मारवाडे, परशुरामकर, शिपाई ताराम, मिसार कोकाडे, कोटांगले, रुद्रावाड या आपल्या साथीदारासह संपूर्ण नवेगावबांध व परिसरात शोधाचक्र फिरविले. राष्टÑीय उद्यान परिसर गोंडउमरी, देवलगाव, मुंगली, भिवखिडकी परिसरात शोध मोहीम राबविली. मंगळवारी (दि.१९) सकाळपासूनच नवेगावबांध येथील रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात करुन नजर ठेवली. दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास आदर्श रेल्वे स्टेशनजवळील एका घराजवळ आढळला. पोलीस पथकाने सदर मुलाला ताब्यात घेऊन त्याची समजूत काढून त्याला आाई-वडिलांच्या ताब्यात दिले.तेव्हा आदर्शच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिस