शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील गावचा जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 8, 2017 00:17 IST

पोलीस पाटील हे पद गावपातळीवर प्रशासनाचे डोळे व हात आहे. प्रत्येक गावात शासन पोलीस तैनात करु शकत नाही.

अभिमन्यू काळे यांचे प्रतिपादन: पोलीस पाटलांची कार्यशाळा गोंदिया : पोलीस पाटील हे पद गावपातळीवर प्रशासनाचे डोळे व हात आहे. प्रत्येक गावात शासन पोलीस तैनात करु शकत नाही. त्यामुळे गावपातळीवरील माहितीचे खरे स्त्रोत पोलीस पाटीलच आहेत. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्याच बरोबर गुन्हे घडणार नाही याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी गावचा जिल्हाधिकारी आहे, असे समजून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटीलांसाठी प्रेरणा सभागृह कारंजा (गोंदिया) येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर उपस्थित होते. यावेळी कार्यपालन अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी म्हणाले, शासनाचा विविध योजना राबवितांना गावपातळीवर पोलीस पाटलांचे सहकार्य घेणे अपेक्षीत आहे. प्रत्यक्ष योजना राबविणे जरी आपले काम नसले तरी पण आपले गाव, स्वच्छ सुंदर व निरोगी ठेवण्याची जबाबदारी पोलीस पाटलांनी स्वीकारावी असे आवाहन केले. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ म्हणाले दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. त्या बदलाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस पाटलांना प्रशिक्षीत करणे आवश्यक आहे. गावातील भिस्त आपणावर अवलंबून आहे. त्यामुळे लक्ष ठेवून गावातील माहिती पोलीस प्रशासनाला त्वरीत पाठवावी. आपले पद शासकीय असल्याने निष्पक्षपणे काम करावे प्रशासन आपले पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली. दुसऱ्या सत्रामध्ये निवासी जिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी प्रशिक्षण दिले. तिसऱ्या सत्रामध्ये दिलीप भुजबळ यांनी पोलीस स्टेशन निहाय आढावा घेऊन समस्यांचे शंका निरसन केले. प्रास्ताविक दिलीप भुजबळ, संचालन मंजूश्री देशपांडे तर आभार भृंगराज परशुरामकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सोमाजी शेंडे, दिलीप मेश्राम, आनंद तुरकर, मोहनींसह बघेल, मनोहर चव्हाण, हेमराज सोनवाने, देवेंद्र भांडारकर, डी.जे.पटले, राजेश बंसोड, प्रेमलाल टेंभरे यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)