गोंदिया : छत्तीसगढ व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब-कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचे पे्रशर कुकरबॉम्ब व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले.या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरीश बैजल यांना मिळताच त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. बैजल यांच्या नेतृत्वात ४० अधिकारी, पोलीस कर्मचारी व सी ६० च्या जवानांनी ही मोहीम राबविली. चिचगडपासून १४ कि.मी अंतरावर असलेल्या कोसबीच्या जंगलात सीपीआय माओवादी संघटनेचे ४० ते ५० नक्षलवादी जमले होते. पोलिसांना पाहातच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. पोलीस आता कोम्बिंग आॅपरेशन राबवत आहेत.
मरामजोब-कोसबी जंगलात पोलीस-नक्षलींची चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 05:05 IST