शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने युवतीला रक्तदान करुन वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात घडला. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र गोंदिया रक्तपेढीत आणि खासगी रक्तपेढीत सुद्धा या रक्ताचा साठा नव्हता.

ठळक मुद्देरक्तपेढीत रक्ताचा तुटवडा : एबी निगेटिव्ह रक्ताची होती गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल एका युवतीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र रक्तपेढीत तुटवडा असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मिळाली. त्यांचा पत्नीचा रक्तगट एबी  निगेटिव्ह असल्याने त्यांनी पत्नीसह लोकमान्य ब्लड बँक गाठून त्यांच्या पत्नीने रक्तदान केले. वेळीच रक्त मिळाल्याने युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.कोरोनामुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात घडला. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र गोंदिया रक्तपेढीत आणि खासगी रक्तपेढीत सुद्धा या रक्ताचा साठा नव्हता. त्यामुळे या तरुणीचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करण्यात आला. गोंदिया येथील रक्त मित्र गुड्डू चांदवानी यांच्याकडे रक्तदात्यांची यादी होती. त्या यादीतील काही व्यक्तींशी संपर्क साधला. चांदवानी  यांनी संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्याशी संपर्क साधृून त्यांना याची माहिती दिली. तायडे लगेच त्यांच्या पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पत्नी किरणसह लोकमान्य ब्लड बँक गाठून रक्तदान केले. तायडे यांच्या पत्नीने वेळीच रक्तदान केल्याने त्या तरुणीचे प्राण वाचविणे शक्य झाले. एबी निगेटिव्ह रक्त हे फारच दुर्मिळ समजले जाते. मात्र रक्तदान हे महान दान समजून वेळीच माणुसकीचा परिचय देत किरण तायडे यांनी रक्तदान केल्याने तरुणीला नवसंजीवनी मिळाली.  

रक्त मित्रांमुळेच झाली मदत येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा पडतो. अशावेळी शहरातील अनेक स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी व सदस्य रक्तदान करण्यासाठी धावून येतात. ते रक्तमित्र म्हणून काम करीत असतात. विनोद चांदवानी, रवी बोधानी, नितीन रायकवार या रक्तमित्रांमुळे युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.  

कोणत्याही नात्यापेक्षा माणुसकीचे नाते हे सर्वात महत्त्वाचे आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे यालाच माणुसकी म्हणतात हाच दृष्टिकोन बाळगून मी सुद्धा रक्तदान केले. गरजूंना रक्तदान करण्यासाठी इतरांनी सुद्धा निसंकोचपणे पुढे येण्याची गरज आहे. - किरण तायडे, (रक्तदाता)

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीPoliceपोलिस