शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली

By admin | Updated: December 20, 2014 01:46 IST

येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात गुंडाचा प्रवेश व त्यांच्याकडून होत असलेला अतिरेक ही काही नवी बाब नाही.

गोंदिया : येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात गुंडाचा प्रवेश व त्यांच्याकडून होत असलेला अतिरेक ही काही नवी बाब नाही. याचीच प्रचिती आणखी एका घटनेतून आली जेव्हा काही तरूणांनी ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजतादरम्यान ही घटना घडली. शिवाय रूग्णालयात आलेल्या रूग्णांचे पाकीटही मारण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दरम्यान काही तरूण रूग्णालयात एका रूग्णाला बघण्यास आले होते. परत जाताना या तरूणांनी आपली मोटारसायकल एका रूग्णवाहीकेपुढे उभी ठेवली. या रूग्णवाहीकेतून एका रूग्णाला हलविले जाणार होते मात्र हे तरूण मोटारसायकल हटविण्यास राजी नव्हते. यावर ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी बालू उद्धव सानप (३१) याने त्या तरूणांना मोटारसायकल हटविण्यास सांगीतले. मात्रत्या तरूणांनी रागाच्या भरात सानप यांचा कॉलर पकडून त्यांनी धमकी दिली व निघून गेले. या प्रकरणी शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३५२, ५०४, ५०६ अंतर्गत प्रकरण नोंद केले आहे. सांगीतले जाते की, या तरूणांत कृष्णपुरा वॉर्ड निवासी खुशाल सतदेवे, विक्की भोयर, संजय गजभिये, अमर गजभिये व इतर तीन-चार तरूणांचा समावेश आहे. यातील काही तरूण गुन्ह्यांत लिप्त असून एकाला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो सध्या सुटीवर बाहेर आल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)अनेकांची पाकिटे मारली ही घटना घडते न घडते तोच रूग्णालयात तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे निर्मल रामअवतार अग्रवाल (३१,रा.गणेशनगर) यांना धक्का देत त्यांच्या खिशातून एकाने पाकीट मारला व साथीदाराला दिला. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत पाकीट मारणाऱ्याचा साथीदार तर पळून गेला मात्र निर्मल यांनी पाकीट काढणाऱ्यास पकडून घेतले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून हे कृत्य करणारे जय करियार व आकाश टेंभेकर (रा.गौतमनगर) हे तरूण आहेत. तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगीतले की, या दोघांनी आणखीही काहींचे पाकीट मारले असून रूग्णालयात ते सतत वावरत असतात. पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.