शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

पोलिसांची दिवाळी ‘आॅन ड्युटी’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:26 IST

सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'आॅन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे.

ठळक मुद्देकर्तव्य : ९० टक्के पोलीस बंदोबस्तावरच, समस्या सुटता सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'आॅन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे.दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास 'आॅन ड्युटी' पहायला मिळतात. जिल्हा पोलिस दलातील ९० टक्क्याहून अधिक कर्मचारी कामावर कार्यरत असून, ते विनातक्रार जबाबदारी पार पाडत आहेत. समाजातील सर्व घटकांतून दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कामासाठी शहरात गेलेले नागरिक दिवाळीसाठी गावाकडे येतात. दिवाळी आली की, आप्तजणांकडे जाण्याचा ओढा सर्वांना लागलेला असतो. घरामध्ये तयार केलेल्या गोडधोड पदार्थांपासून खमंग चिवड्याचा स्वाद घेत परिवारासमवेत दिवाळी साजरी केली जाते. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही. दिवाळी सण असल्याने बसस्थानक, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार हे ओळखून अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे असते. गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया किंवा चोरीसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस बंदोबस्तासाठी थांबावे लागते. देशभरात कुठेही अनुचित घटना घडली की, हायअलर्ट लागू झाल्यानंतर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येतात. पोलिसांचे संख्याबळ जितके आवश्यक आहे त्यापेक्षा कमीच संख्याबळ असते. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरच कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तपास करणे, रात्र गस्त, चौकी सांभाळणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात.सोमवारपासून सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. आबाल वृद्धांची बाजारात गर्दी दिसत आहे. या कालावधीदरम्यान जनतेचे रक्षण करण्यासाठी पोलिसांची रात्रीची गस्त सुरु असते. संबंधित पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक गस्तीसाठी रात्रभर तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांंची दिवाळी सुखकारक होवो, यातच पोलिसांना दिवाळीचे समाधान वाटत असते.महिला पोलिसांची अडचणदिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणी करतात. मात्र महिला पोलिसांना कामावरुन रजा मिळत नसल्याने वेळात वेळ काढून घरी जाऊन फराळ बनवावे लागते. शिवाय दिवाळीसाठी सून सासरी यावी, अशी सासरच्यांची इच्छा असते. मात्र कामावरुन सुटी मिळत नसल्याने सासरच्यांना समजावून सांगावे लागते. प्रसंगी नाराजी ओढावून घ्यावी लागते, अशी अडचण महिला पोलिसांची आहे. भाऊबिजेलाही हीच अडचण निर्माण होते. ही भावना समजुन घेणे गरजेचे आहे.टाइमटेबल नाहीपोलिस खात्यात रुजू होण्याआधीच २४ तास 'आॅन ड्युटी' ही संकल्पना डोक्यात ठेवूनच पोलिस कामावर हजर होतात. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होणार नाही, याची जाणिव असते. सध्या दिवाळीनिमित्त चोख बंदोबस्त असल्याने कधी घराला जायला मिळते किंवा नाही, याचा कोणताही टाइमटेबल नाही. आजारी किंवा अपरिहार्य कारणास्तव सुटी घेतलेले पोलिस वगळता बहुतांश पोलिस हजर आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसDiwaliदिवाळी