शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकचा कचरा पर्यावरणाला घातक

By admin | Updated: June 6, 2017 01:04 IST

प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आजही अनेक दुकानदार सर्रास प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत.

प्रशासन बेफिकीर : नागरिकांचेही निष्काळजी धोरणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आजही अनेक दुकानदार सर्रास प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक पानठेल्यावर विकला जाणारा खर्रा प्लास्टिकमध्येच दिला जातो. या प्लास्टिकबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही. विविध वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे वेस्टन व प्लास्टिक पिशव्या ैही आज सर्वात मोठी डोकेदुखीची बाब ठरली आहे. प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणाला घातक ठरणारा सर्वात मोठा घटक ठरला आहे.विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. त्यासाठीच शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र शासन स्तरावरूनही पर्यावरण संरक्षणासाठी काही कठोर नियम करण्याची गरज आहे. आज प्रत्येक वस्तूला प्लास्टिकचे वेस्टन वापरले जात आहे. कापडी पिशव्यांऐवजी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्तोरस्ती प्लास्टिक कचऱ्यांचे ढिगारे व उडणारा कचरा शहर व गावांना बकाल स्थितीत आणत आहे.शहर व गावांचे प्रशासन त्यावर उपाययोजना करण्यास हतबल ठरत आहे. त्यामुळे शासनानेच आता प्लास्टिक उत्पादनावर बंदी आणण्याची गरज आहे. पाण्याचे पाऊच तर प्लास्टिकच्या कचऱ्यात अग्रणी क्रमांकावर आहे. आता तर भोजनावळीतूनही भांडी हद्दपार होऊ लागली आहे. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तोच कचरा नाल्या, गटारे यामध्ये साचतो. परिणामी नाल्या-गटारे यांचे प्रवाह बंद होतात.पाळीव जनावरे प्लास्टिक खाऊन मृत्यूमुखी पडत आहेत. प्लास्टिकचा कचरा जाळल्याने निर्माण होणारा वायू सजिवांच्या जीवनाला घातक ठरतो. त्यामुळे शासनाने प्लास्टिक निर्मितीवर एकतर आळा घालावा किंवा प्लास्टिकचा पुनर्वापर करणारे प्रकल्प ठिकठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे. प्लास्टिक जाळून वीज निर्मिती करणे, रस्ते बांधकामत प्लास्टिकचा वापर करणे, अशा उपाययोजना करणे काळाची गरज बनली आह. अन्यथा भविष्यात मोटे संकट उभे ठाकणार आहे.