शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या पोटात राहिला प्लास्टिकचा पाईप

By admin | Updated: July 26, 2015 02:04 IST

पंचायत समिती सालेकसा येथील कार्यरत लेखापाल संजय मधुकर टिकेकर यांना मूतखड्याचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी बी.जे. हॉस्पिटल गोंदिया येथे मुतखडा काढण्यासाठी...

ग्राहक मंचाकडे धाव : सहा महिन्यानंतर पुन्हा केली शस्त्रक्रिया सालेकसा : पंचायत समिती सालेकसा येथील कार्यरत लेखापाल संजय मधुकर टिकेकर यांना मूतखड्याचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी बी.जे. हॉस्पिटल गोंदिया येथे मुतखडा काढण्यासाठी श्स्त्रक्रिया करवून घेतली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे सहा इंच लांब प्लास्टिकचा पाईप संजय टिकेकर यांच्या पोटात राहिले. सतत सहा महिने त्रास झाल्यावर पुन्हा सोनोग्राफी द्वारे माहीत झाल्यावर पुन्हा पाईप काढण्यासाठी पैसे वसूल करण्यात आले. त्यामुळे संजय टिकेकर यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. सविस्तर असे की, लेखापाल संजय टिकेकर यांना अनेक दिवसांपासून मुतखडयाचा त्रास होता. अनेक प्रकारे औषधी घेतल्यानंतरही त्याचा मुतखडा विळून बाहेर पडला नाही. तेव्हा त्यांनी बी.जे. हॉस्पीटल गोंदिया येथे उपचार करायला गेले. तिथे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. टिकेकर यांनी शस्त्रक्रियेसाठी तयारी दर्शविली. २२ मार्चला संजयची शस्त्रक्रिया करुन मुतखडा काढण्यात आला. परंतु त्याच दरम्यान संजयच्या पोटात किडनीजवळ सहा इंच लांब प्लास्टिकचे पाईप ठेवले होते. ते न काढताच आॅपरेशन शिवण्यात आले. त्यामुळे संजयच्या पोटात दुखने बंद होण्याऐवजी वाढत गेले. त्यांनी या त्रासाबद्दल डॉक्टरांना सांगिले तेव्हा त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. काही दर्दनाशक गोळ्या घेतल्यावर दुखणे बंद होऊन जाईल, असे म्हणत त्यांना औषधी लिहून दिली. दवाखान्यातून सुटी देण्यात आली. यासाठी त्यांना एकंदरित ५२ हजार रुपयांचा खर्च लागला. घरी आल्यावर वेदनानाशक औषधीचे सेवन केल्यावर सुद्धा त्याचे पोटात दुखणे कमी होण्याऐवजी वाढत गेले. तेव्हा त्यांनी आमगाव येथे डॉ. साजीद खान यांच्याकडे तपासणी करविली. त्यांनी संजयला सोनोग्राफी करण्याची सल्ला दिला. टिकेकर यांनी गोंदिया येथील डॉ.सोनल गुप्ता यांच्याकडे जाऊन सोनोग्राफी व एक्सरे काढून घेतले. त्यात रिपोर्टमध्ये पोटात प्लास्टिक पाईप असल्याचे निष्पन्न झाले. तो रिपोर्ट घेऊन संजय टिकेकरने पुन्हा बी.जे. हॉस्पीटलचे द्वार ठोठावले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करुन पाईप बाहेर काढले. मात्र स्वत: चूक करुनही पुन्हा ११५० रुपये संजयकडून वसूल केले आहेत. या सर्व प्रकरणामुळे टिकेकर यांनी क्षुब्ध होवून जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.अशा पद्धतीने डॉक्टरांची चूक असतानाही त्यांनी ती कबूल न करता रुग्णांना वेठीस धरण्याच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)