शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लाझ्मा युनिटला पडला डोनर्सचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

अशात उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत सुद्धा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्लाझ्माला मागणी असतानाच डोनर मिळत नसल्याने मात्र प्लाझ्मा युनिटपुढे डोनर्सचा प्रश्न उभा आहे. अशात कोरोना मुक्त झालेल्यांनी आता जीवदानाच्या महाकार्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज आहे.  जिल्हयात मध्यंतरी कोरोना बाधित व मृतांची संख्या झपाट्याने वाढली होती. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी १३२८९ वर पोहचली असून मृतांची संक्या १७५ झाली आहे.

ठळक मुद्देफक्त ५ डोनर्सनेच घेतला पुढाकार : कोरोनामुक्त रूग्णांच्या पुढाकाराची गरज

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना उपचारातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २८ दिवस किंवा ३ महिन्यांच्या आतील व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र असतो. अशात जिल्ह्यातील ऑक्टोबर, नोव्हेंबर व सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यातील १८ दिवस ग्राह्य धरल्यास सुमारे ७७२९ व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र दिसून येत आहेत. मात्र जिल्ह्याची शोकांतिका अशी की, येथील प्लाझ्मा युनिटमध्ये आतापर्यंत फक्त ५ व्यक्तींनीच प्लाझ्मा डोनेट केले आहे. अशात उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत सुद्धा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्लाझ्माला मागणी असतानाच डोनर मिळत नसल्याने मात्र प्लाझ्मा युनिटपुढे डोनर्सचा प्रश्न उभा आहे. अशात कोरोना मुक्त झालेल्यांनी आता जीवदानाच्या महाकार्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्हयात मध्यंतरी कोरोना बाधित व मृतांची संख्या झपाट्याने वाढली होती. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी १३२८९ वर पोहचली असून मृतांची संक्या १७५ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचा दर ९५.२४ टक्के असून हा आकडा दिलासादायक असतानाच मात्र एकही मृत्यू होणे ही बाब मात्र गंभीर आहे. अशात वेळीच गंभीर रूग्णाला प्लाझ्मा दिल्यास त्याचे जीवन वाचविण्याची शक्यता वाढून जाते. यामुळेच आजघडीला प्लाझ्मा दान हेच गंभीर रूग्णांसाठी जीवदान ठरत आहे. म्हणूनच मध्यंतरी झालेला कोरोनाचा स्फोट बघता आरोग्य यंत्रणा व जिल्हावासीयांकडून प्लाझ्मा युनिट सुरू व्हावे अशी मागणी जोर धरू लागली होती. यावर जिल्ह्याला प्लाझ्मा युनिट देण्यात आले व ७ डिसेंबरपासून प्लाझ्मा युनिट कार्यान्वीत झाले आहे. मात्र शोकांतीका अशी की, आतापर्यंत युनिटमध्ये फक्त ५ व्यक्तींनीच प्लाझ्मा डोनेट केले आहे. यातील ३ आरोग्य कर्मचारी असून २ इतर आहेत. या ५ व्यक्तींकडून उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच, जिल्ह्यात गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्माची मागणी सुरू झाल्याचे दिसते. अशात प्लाझ्मा युनिटकडे डोनर असल्यास गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्मा देता येणार. मात्र ५ डोनर्सनंतर प्लाझ्मा युनिटकडे डोनरच नाही. अशात मात्र गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्माची मागणी वाढल्यास प्लाझ्मा युनिट त्यांना प्लाझ्मा देऊ शकणार नाही व अशात एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही. मात्र डोनर नसल्याने प्लाझ्मा युनिटला डोनर्स कोठून आणायचे असा प्रश्न पडला आहे.

१५ दिवसांत करता येते प्लाझ्मा डोनेट एखाद्या व्यक्तीने प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर त्या व्यक्तीला १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा डोनेट करता येते व त्यामुळे त्या व्यक्तीला कुठलाही धोका नाही. तर रक्तदान केल्यानंतर ३ महिने रक्तदान करता येत नाही. अशात प्लाझ्मा डोनेट करून कोरोनामुक्त झालेली व्यक्ती गंभीर रूग्णांसाठी देवदूतच ठरणार आहेत. यासाठी मात्र  अशा व्यक्तींनी आता स्वेच्छेने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेऊन जीनदानाच्या कार्यात सहभाग घ्यावा असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्राचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात सुमारे ७७२९ कोरोना मुक्त कोरोेनातून बरे होऊन डिस्चार्ज झाल्यानंतर ती व्यक्ती २८ दिवसांनी तसेच ३ महिने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र असते. अशात २८ दिवस झालेल्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात एंटीबॉडीज असतात. तरिही जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३९९८, नोव्हेंबर महिन्यात २११८ तर डिसेंबर महिन्यातील १८ दिवसांत १६१३ म्हणजेच एकूण ७७२९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील ५० टक्के रूग्ण वयोवृद्ध गृहीत धरले तरिही उरलेल्या ३८६४ व्यक्तींनी प्लाझ्मा डोनेट केल्यास त्यापासून नक्कीच गंभीर रूग्णांचा जीव वाचविता येणार आहे. अशात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी या जीवदानाच्या कार्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या