शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी रोवण्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकºयांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त । तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा (बुजरुक) : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या बंद असून शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील ८-१० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे.तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत असून दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहे. सध्या परिसरात नदी किनाऱ्यालगतच्या ज्या शेती आहेत त्यांनी नदी काठावर विद्युत मोटार पंप लावून रोवणी सुरु केली आहे. यात करटी खुर्द, इंदोरा बुज., बिहिरीया, चांदोरी खुर्द, सावरा, पिपरीया, अर्जुनी येथील शेतकऱ्यांनी विद्युत पंपाद्वारे रोवणी करीत आहेत.तसेच ज्यांच्याकडे विहीर व तलाव आहेत त्यांचे सुद्धा रोवणीचे काम सुरु आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे कुठलेच साधन नाही ते अजून रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.मागील १३ जुलैपासून ढगाळ वातावरण व पाऊस येईल असे वातावरण असताना सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली नाही. कुठे-कुठे थोडाफार पाऊस झाला. परंतु शेतात पाणी साचले नाही. पावसाळा लागला तेव्हापासून तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही व तलाव, नाले अजून भरले नाहीत. मृग नक्षत्रामध्ये धानाची पेरणी झाली व फक्त रोपे जगण्या पुरताच पाऊस आला. आता पुनर्वसू नक्षत्र संपणार आहे. १९ जुलैपासून पुष्प नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असून या नक्षत्रामध्ये हत्ती सोंड हलवितो का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाणी मिळावे म्हणून धापेवाडा उपसा सिंचन योजनेमधून चोरखमारा, बोदलकसा, खैरबंधा तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. सिंचन योजनेतून तलावात पाणी गेले ही असेल. परंतु खैरबंधा जलाशयाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत केव्हा येईल व रोवणीच्या कामाला केव्हा सुरुवात होईल याचीही चिंता शेतकऱ्यांना आहे.या जलाशयाच्या शेवटच्या टोकावरची गावे अर्जुनी, परसवाडा, बघोली, इंदोरा बुज., बिहिरीया, करटी बुज., करटी खुर्द, खैरलांजी, सावरा, पिपरीया, गोंडमोहाळी, किंडगीपार ही आहेत. या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी येईल का यात शंकाच वाटत आहे. तेव्हापर्यंत जुलै महिना संपेल व ऑगस्टच्या २ तारखेला आलेल्या नक्षत्राची सुरुवात होईल. या चिंतेमध्ये शेतकरी लागला आहे. तेव्हा परिसरात दमदार पाऊस केव्हा होईल या आशेवर शेतकरी आहे.ज्यांनी रोवणी केली तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण रोवणी करुन पाणी नसल्याने पऱ्हे वाळलेली आहेत. ज्यांची रोवणी झाली नाही तेही शेतकरी दु:खी आहेत. कारण शेतामधील खारी सुद्धा पिवळ्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी