शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळावर प्लेन झाले हायजॅक !अन् धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ सुरू होते. काय सुरू आहे विमानतळावर उपस्थित प्रवाशांनासुद्धा काही कळत नाही. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा परिस्थिती यशस्वीपणे हाताळते आणि प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढते आणि सारेच सुटकेचा निश्वास सोडतात.  तालुक्यातील बिरसी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात होणार आहे. सध्या या विमानातळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली नसली तरी या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : गुरुवारी सकाळी ११ वाजता वेळ, बिरसी विमानतळावर बाहेरून एक विमान उतरते, त्यानंतर काही क्षणांतच प्लेन हायजॅक झाल्याची वार्ता येते आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू होते. यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या जातात. विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ सुरू होते. काय सुरू आहे विमानतळावर उपस्थित प्रवाशांनासुद्धा काही कळत नाही. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा परिस्थिती यशस्वीपणे हाताळते आणि प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढते आणि सारेच सुटकेचा निश्वास सोडतात. तालुक्यातील बिरसी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात होणार आहे. सध्या या विमानातळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू झाली नसली तरी या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस विमानतळावर आपात्कालीन घटना घडल्यास त्याचे नियोजन कसे करायचे, सुरक्षा आणि विमानतळ यंत्रणा त्याची वेळीच हाताळणी कशी करेल याची रंगीत तालीम घेण्यात आली. ॲन्टी-हायजॅक माॅक एक्सरसाइज कार्यक्रम घेण्यात आला. बिरसी विमानतळ येथे ॲन्टी-हायजॅक माॅक एक्सरसाइज कार्यक्रम गुरुवारी (दि.२९) आयोजित करण्यात आला. यावेळी बिरसी विमानतळ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नयना गुंडे, संयोजक बिरसी विमानतळचे संचालक बैजू के.वी., सदस्य पोलीस अधीक्षक पानसरे, बिरसी विमानतळाचे  सहायक महाप्रबंधक विनय ताम्रकार, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेन्द्र नीरमालकर, एयरपोर्ट टर्मिनल व्यवस्थापक इंडियन ऑइलचे वसंत पारडीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव, रावणवाडीचे ठाणेदार उदयराज डमाले, बिरसी विमानतळाचे प्रभारी सहायक निरीक्षक गणपत धायगुडे, एनएफटीआई व इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान ॲकॅडमी व बिरसी विमानतळ कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AirportविमानतळPoliceपोलिस