शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परमेश्वरापेक्षाही गुरूंच स्थान महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक दिनानिमीत्त आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी होते.

ठळक मुद्देसीमा मडावी : जिल्ह्यातील सात आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘गुरू गोविंद दोनो खडे किसके लागू पाय, बलहारी गुरू आपकी गोविंद जिन्हो बताय’परमेश्वराची ओळख करून देणाऱ्या गुरूंचे स्थान ईश्वराहूनही मोठे आहे. उद्याचे राष्ट्र घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर असते त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू असते.आपला आदर्श समाजापुढे ठेऊन ज्ञान देण्याचे पवित्र काम इमाने इतबारे करतात तेच गुरूजी आदर्श ठरतात,असे उदगार जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी काढले.जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षक दिनानिमीत्त आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.राजा दयानिधी होते.या वेळी प्रामुख्याने जि.प.चे उपाध्यक्ष व अर्थ आणि बांधकाम सभापती अल्ताफ अकबर अली हमीद, शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी व पशूसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने,समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सदस्य उषा शहारे, प्रीती रामटेके, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे,उपशिक्षणाधिकारी राजकुमार रामटेके, सुनील मांढरे उपस्थित होते. या वेळी प्राथमिक विभागातील पाच तर माध्यमिक विभागातील दोन अशा सात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविन्यात आले. प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून जि.प.उच्च प्राथमिक शाळा कारंजा येथील मुनेश्वर तिलकचंद जैतवार,आमगाव तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा बोरकन्हार येथील सहाय्यक शिक्षीका प्रभा ब्रिजलाल गायधने, देवरी तालुक्यातून जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळा इस्तारी येथील मंगलमूर्ती किसन सयाम, गोरेगाव तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा सुकाटोला येथील परमानंद सेवकराम रहांगडाले, तिरोडा तालुक्यातून जि.प.वरिष्ट प्राथमिक शाळा नवेगावबांध येथील तेजलाल ब्रिजलाल भगत, माध्यमिक विभागातून देवरी तालुक्यातून जि.प.हायस्कूल ककोडी येथील लक्षमण छंदर आंदळे व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथील भास्कर कुसन मानापुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबत आठही तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील ७० विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन दिलीप बघेले, कुलदीपीका बोरकर यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी आर.पी.रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन