शावकावर उपचार सुरू : ओळख पटविण्यासाठी लावले तीन कॅमेरेगोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत पिपरटोला जंगलात बेपत्ता मादी बिबटला शोधण्यासाठी गेलेल्या वन्यप्रेमींना एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. बिबटने त्या गोऱ्हयाला ठार केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्या गोऱ्हयाची शिकार करणारा बिबट ‘ती’ मादा आहे किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्या परिसरात तीन कॅमेरे बसविण्यात आले आहेत.गोरेगाव तालुक्याच्या पिपरटोला येथील जंगलपरिसरात मादा बिबटचा शोध घेण्यासाठी भारतीय वन्यजीव न्यासचे अनिलकुमार, सौम्यदास गुप्ता, ज्ञानेश्वर राऊत गेले असता त्यांना पिपरटोला येथील पोलीस पाटील भोजराज शिवणकर यांच्या शेतात एक गोऱ्हा मृतावस्थेत आढळला. तो गोरा प्रेमलाल येडे यांचा होता. येडे यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर बिबट्याने त्या गोऱ्हयाला ठार केले. ही घटना रविवारी सकाळी ७.४५ वाजता दरम्यान उघडकीस आली. याची मािहती त्यांनी उपवनसंरक्षक गोंदिया व गोरेगावच्या वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालायाला दिली. चोपा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेंद्र पटले यांनी त्या गोऱ्हयाचा पंचानामा केला. त्या गोऱ्ह्याला एका जागी ठार करून बिबटने दुसऱ्या ठिकाणी ओढत नेले. ती शिकार बिबट्यानेच केली हे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र त्या मादा बिबटने ही शिकार केली की दुसऱ्या बिबटाने केली हे स्पष्ट झाले नाही. त्यासाठी त्या ठिकाणी त्या मादा बिबटची ओळख पटविण्यासाठी तीन कॅमेरे त्या परिसरात वन्यजीवचे मानद सदस्य सावन बहेकार यांच्या मदतीने लावण्यात आले. त्या गोऱ्हयाच्या मासासाठी बिबट आले तर ते मादा आहे का याचा शोध कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शिकार होण्याची शक्यताबेपत्ता मादी बिबटची शिकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या क्षेत्रात वाघ विचरण करीत असल्याचा अंदाजही लावला जात आहे. याच वाघाने बिबट मादीचा शिकार केला असावा, अशी चर्चा क्षेत्रात सुरू आहे. बेपत्ता बिबटच्या शोधात वन विभागाच्या चमू मागील तीन दिवसांपासून वनात शोध मोहीम राबवित आहेत. अशात बिबट मादीचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चमूवर अस्वलाचा हल्लापिपरटोला जंगलात बेपत्ता मादी बिबटला पकडण्यासाठी शोध सुरू केलेल्या गोरेगाव वनपरिक्षेत्राचे आरएफओ एस.एफ. जाधव यांच्यावर अस्वलाने शुक्रवारी हल्ला केला. जाधव यांनी मोठ्या सजगतेने अस्वलापासून स्वत:ला वाचविले. त्यानंतर अस्वलाने घटनास्थळावरून पळ काढला.गोरेगाव वन परिक्षेत्रांतर्गत पिपरटोला जंगलात बिबट्या एक शावक मृतावस्थेत तर दुसरा शावक जीवंत ७ मे रोजी पकडण्यात आला. परंतु आतापर्यंत बिबट मादीचा कुठेही शोध लागू शकला नाही. तिला शोधण्यासाठी गोरेगाव वनविभाग मागील तीन दिवसांपासून ४० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोध अभियान राबवित आहे. शावक पशु रूग्णालयातबिबटच्या जखमी शावकाला गोरेगाव वनविभागाने पकडून पशु रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला वन विभागात सुरक्षित ठेवण्यासाठी आणण्यात आले. या शावकाला आहारात दुधासह चिकन सूप दिले जात आहे. त्याच्या सुरक्षेसाठी दोन कर्मचारी तैनात केले आहेत. ते वेळेवर चिकित्सकाच्या मार्गदर्शनात शावकाचा उपचार करून आहार देतात.
पिपरटोला येथे बिबट्याने केले गोऱ्ह्याला ठार
By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST