गोंदिया : देवरी तालुक्याच्या मुल्ला येथील तलाठी एस.एम. पिंपळे यांना सन २०१४-१५ या वर्षाचा आदर्श तलाठी पुरस्कार महाराष्ट्रदिनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पाच हजार रूपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात आला. मागील १५ वर्षापासून केलेल्या कामाची दखल घेण्यात आली. १० वर्षाचा त्यांचा चारित्र्य अहवाल पाहून त्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांनी देवरी तालुक्यातील गौण खनिजाची १७ प्रकरणे करून ५१ हजाराचा महसूल एकाच वर्षात शासनाला मिळवून दिला. तहसीलदार संजय नागटीळक यांनी त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला होता. मागील चार वर्षापासून त्यांचा प्रस्ताव येत होता. परंतु याच वर्षी त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्कार पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सूर्यवंशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप पखाले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पिंपळे यांना आदर्श तलाठी पुरस्कार
By admin | Updated: May 3, 2015 01:27 IST