शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लोकांच्या विश्वासाची हत्या झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:37 IST

भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : गणेशनगरातील प्रचारसभेत विरोधकांवर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.येथील गणेशनगर येथील मैदानावर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, डॉ.खुशाल बोपचे, भाजचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ. भेरसिंग नागपुरे, केशव मानकर, हेमंत पटले, माजी आ. रमेश कुथे, राजकुमार कुथे व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, आमच्या सरकाराने स्वच्छ भारत अभियान सुरू केले. काँग्रसने ६७ वर्षात ५० लाख कुटुंबासाठी शौचालय देशात बांधले. परंतु आमच्या सरकारने ३ वर्षात ६० लाख कुटुंबांसाठी शौचालये बांधली. देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ वर्षे पूर्ण होताच या देशातील गरीबातील गरीबाचे घर असेल. २ वर्षात ४ लाख घरे एकट्या महारष्ट्रात दिले. अजून ग्रामीण भागात ८ लाख घरे देणार आहोत. गोंदिया जिल्ह्यातील ९० हजार कुटुंबांना घरे देणार आहोत. शहरातील फुटपाथवरील लोकांना पट्टे देत आहे. नझुलच्या जागेलाही पट्टा दिला. निर्वासित सिंधी समाजाला पट्टे दिले. गोंदिया नगर परिषदेला २ वर्षात ५२ कोटी रूपये दिले आहेत. रोजगार देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील सहा महिन्यात देशातील ३० लाख लोकांना रोजगार देता आले. त्यातील ८ लाख रोजगार महाराष्टष्ट्रात देण्यात आले आहे. महाराष्ट्र रोजगार देण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील चार वर्षापासून शेतकऱ्यांना २०० रूपये बोनस देत आहे. शिक्षण, आरोग्याच्या सेवेसाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात विरोधकांवर टिका केली. संचालन व आभार दीपक कदम यांनी मानले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री