शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोषाहाराचे महत्त्व सामान्यांना कळावे

By admin | Updated: September 4, 2016 00:19 IST

व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती मिळालेला

अधिष्ठाता केवलिया : राष्ट्रीय पोषाहार सप्ताहगोंदिया : व्यक्तीला जीवनात निरोगी व सुदृढ राहायचे असेल तर पोषाहाराचे महत्व प्रत्येकाला कळले पाहिजे. विशेषत: लहान मूल व गर्भवती मिळालेला योग्य पोषाहार वेळेत मिळाले तर त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी व्यक्त केले.१ सप्टेंबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे उदघाटक म्हणून डॉ.केवलीया बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल परियाल, मेट्रन निरंजन फुलझेले उपस्थित होते.डॉ.केवलीया पुढे म्हणाले, कशाप्रकारे आहार घ्यावा याबाबत काही पध्दती आहेत. काही पध्दतीबाबत भ्रम आहेत. आहार तज्ज्ञांनी जनमाणसामध्ये पोषाहारा बाबत असलेला गैरसमज दूर करण्याचे काम करावे. डॉ.पातुरकर म्हणाले, आपण काय खातो, कसे खातो, किती खातो हे आहारात महत्वाचे आहे. मानवी आहारात जीवनसत्व, धातू, खनीजे यांचा समावेश असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व्यसनापासून दूर राहून सकस आहार घेतला पाहिजे. किती खावे याची सुध्दा मर्यादा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदेवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या पोषाहार सप्ताहानिमीत्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनीची पाहणी मान्यवरांनी केली. यावेळी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले रु ग्ण त्यांचे नातेवाईक, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.यशस्वीतेसाठी विनय पटले, एकता मोगरे, योगेश वलथरे व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आभार आहारतज्ज्ञ शिल्पा आंबेकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)