शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नियम तोडणाऱ्या ५६२ वाहन चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:26 IST

जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला.

ठळक मुद्देस्पेशल ड्राईव्ह : दिवसभरात दीड लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. एक लाख ४७ हजार ७०० रूपयांचा दंड एकाच दिवसात दुचाकी वाहनचालकांच्या खिशातून वसूल करण्यात आला.जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मरण पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. त्यामुळे जखमी व्यक्ती अवकाळी मरण पावतात. वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे पोलिसांना यापूर्वी दंड करण्यात आला होता. सामान्य नागरिकांनीही वाहन चालवितांना हेल्मेट वापरावेत म्हणून त्यांच्यासाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली.त्यानुसार, शुक्रवारी (दि.२६) हेल्मेट न लावता वाहन चालविणाºया वाहनचालकांना दंड ठोठवण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.यात, हेल्मेट न वापरणाºया ११७ वाहनचालकांना ५०० रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. ८० जणांना ट्रीपल सीटसाठी तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या १९ वाहनांना यासह शहरातील चार पॉर्इंटवर २०४ प्रकरणातून दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस