शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे १५० कोटीचे चुकारे, बोनस थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:12 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धानावरील बोनस आणि रब्बी हंगामात विक्री केलेल्या धानाचे १५० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत.

ठळक मुद्देपुन्हा महिनाभर प्रतीक्षाचखरीप हंगाम अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धानावरील बोनस आणि रब्बी हंगामात विक्री केलेल्या धानाचे १५० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत.परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला असून त्यांच्यावर उधार उसनवारी करुन वेळ मारुन नेण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गेल्या खरीप हंगामातील ३० लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने १० लाख क्विंटल धान खरेदी केली होती. शासनाने मागील वर्षी धानाला २०० रुपये दरवाढ आणि प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. दरवाढ आणि बोनसची एकूण रक्कम मिळून शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे मिळणार होती. याचा लाभ केवळ ५० क्विंटलपर्यंत धानाची विक्री केल्यानंतर मिळणार होता. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता. बोनससाठी एकूण १९३ कोटी रुपयांची गरज होती. यापैकी ११० कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला महिनाभरापुर्वी प्राप्त झाला आहे. तर ८३ कोटी रुपयांचा बोनसचा निधी अद्यापही शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करणे ठप्प झाले आहे. तर हीच स्थिती रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. रब्बी हंगामात आत्तापर्यत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ५ लाख क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने २ लाख ५० हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे. मात्र दोन्ही विभागाकडे चुकारे करण्यासाठी अद्यापही निधी उपलब्ध झालेला नाही. एकट्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे ७० कोटी रुपये थकले आहे. बोनस आणि चुकाऱ्याची एकूण रक्कम पाहता १५० कोटी रुपयांची गरज असून हा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार याबाबत अनिश्चतता आहे. बोनस आणि चुकाऱ्याची रक्कम थकल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली असून खरीप हंगामाचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.पुन्हा करावी लागणार महिनाभराची प्रतीक्षाकोरानामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शासनाच्या विविध महसुली उत्पन्नात घट झाली आहे. याचाच परिणाम विविध बाबींवर झाला आहे. शासनाकडे निधीचा अभाव असल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धानाचे चुकारे करण्यासाठी निधी प्राप्त होण्यास विलंब होत आहे.चुकारे आणि बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी निधी प्राप्त होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी