शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पवनीत १२२ जणांचे महारक्तदान

By admin | Updated: September 8, 2016 00:30 IST

जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लष्करातील जवानांसाठी ५० हजार रक्तबाटल्या

नवेगावबांध : जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लष्करातील जवानांसाठी ५० हजार रक्तबाटल्या व महाराष्ट्र सरकारला ५० हजार रक्तबाटल्या असे एकूण एक लाख बाटल्या दान करण्याचा महासंकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री संप्रदाय तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने ३ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे येथे १२२ रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या.रक्तदान शिबिरादरम्यान श्री संप्रदायाचे अनुयायी, ए.ओ.पी. पवनी-धाबे.चे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे.चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, आश्रम शाळा, जि.प. शाळा व महाविद्यालय तसेच परिसरातील युवावर्ग अशा १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.उद्घाटन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य मंदा कुंभरे, पं.स. सदस्य पे्रेमलाल गेडाम, सरपंच केसराम छीकुंवर, डॉ. हजारे, डॉ. मेंढे, पीएसआय पाटील, नाजूक कुंभरे, नरेश बुडगेवार, विश्वेसर कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नगरसेवक कल्याण डोंबविलेचे दशरथ घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ता शैलेश जायस्वाल यांनी भेट दिली व कौतुक केले. कार्यक्रमासाठी सर्व सेवा केंद्राचे अध्यक्ष, तालुका, जिल्हा कमिटीचे अधिकारी तसेच मंजुषा तरोणे, जयपाल खांडवाये, पुरुषोत्तम वल्के, रमेश मस्के, भेंडारकर, पटे, रामकृष्ण भोयर, रमेश बाकरे यांनी सहकार्य केले. संंचालन महेंद्र रहिले यांनी केले. आभार गावड यांनी मानले.