शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:32 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही.

ठळक मुद्देतिरोडा आगाराची बससेवा ठप्प : बाहेरून आलेल्या बसेस सुखरूप रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बंदला तिरोडा आगारातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत एकही बस आगाराबाहेर पडली नाही. मात्र बाहेरून आलेल्या बसेस सुरळीतपणे रवाना करण्यात आल्या. तर गोंदिया आगारात संपाचा काहीच परिणाम दिसून आला नाही. या आगारातील बससेवा सुरळीतपणे सुरू होती.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली पगारवाढ मान्य नसल्यामुळे गुरूवारी (दि.७) रात्री १२ वाजतापासून एस.टी. कर्मचारी बेमुदत संपावर गेले. त्यामुळे तिरोडा आगारातील ४५ बसेस आगारात उभ्याच होत्या. ७० चालक, ६५ वाहक व २० इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. बसफेऱ्या न झाल्याने सुमारे चार लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गांना ये-जा करण्यास बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी जाता आले नाही. इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना काळी पिवळी वाहनाचा आधार घ्यावा लागला. तिरोडा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, साकोली व नागपूर येथून आलेल्या बसेस सुखरूपपणे पुढील प्रवासाकरिता सोडण्यात आल्या. तसेच संध्याकाळी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळताच काही बसफेऱ्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपामुळे असलेले कर्मचारी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसले होते. तर प्रवासी आपले सामान घेवून कोणती बस किंवा इतर साधन मिळेल याकरिता शोधाशोध करीत होते.

टॅग्स :ST Strikeएसटी संप