शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप

By अंकुश गुंडावार | Updated: May 28, 2024 19:16 IST

गोंदिया रेल्वेस्थानकावर दीड तास गोंधळ : पाच कोचमधील एसी बंद, रेल्वे विभागावर रोष

गोंदिया : शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील (कुर्ला) पाच कोचमधील एसी बंद असल्याने प्रवाशांनी मंगळवारी (दि.२८) दुपारी ३:२५ वाजता गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी पोहोचल्यानंतर चांगलाच संताप व्यक्त केला. जोपर्यंत गाडीतील एसी सुरू होणार नाहीत, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती. यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर जवळपास दीड तास प्रवासी आणि रेल्वे अधिकारी यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, पुढील स्थानकावर एसी दुरुस्ती करून सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ४:४८ वाजता ही गाडी नागपूरकडे रवाना झाली.

प्राप्त माहितीनुसार शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेस ही शालिमार रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर या गाडीच्या १ कोचमधील एसी खडगपूरजवळ बंद झाला. याची तक्रार प्रवाशांनी टीसी व रेल्वेच्या ॲपवर ऑनलाइन नोंदविली; पण यानंतरही याची दखल घेण्यात आली नाही, तर रायपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी येईपर्यंत पुन्हा दोन कोचमधील एसी बंद झाले. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला. आधीच उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कोचमधील एसी बंद पडल्याने प्रवाशांसह लहान मुलांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला. 

तेव्हा गाडीतील टीसी आणि तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी पुढील स्थानक येईपर्यंत एसी सुरू होतील, असे सांगितले. मात्र, गोंदिया रेल्वेस्थानकावर ही गाडी येईपर्यंत पाच कोचमधील एसी बंद पडले. त्यामुळे सर्व एसी कोचमधीलमधील प्रवाशांनी गोंदिया रेल्वेस्थानकावर खाली उतरत गोंधळ घातला. स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर एकत्र होत जोपर्यंत गाडीतील एसी सुरू होत नाहीत तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर ही गाडी जवळपास दीड तास उभी राहिली. 

दरम्यान, गोंदिया रेल्वेस्थानकावर टेक्नेशियनला या गाडीत पाठवून नागपूर रेल्वेस्थानक येईपर्यंत एसी सुरू करण्याची ग्वाही स्टेशन व्यवस्थापकांनी प्रवाशांना दिली. त्यानंतर प्रवाशांनी माघार घेतली. यानंतर सायंकाळी ४:४८ वाजता ही गाडी नागपूरकडे रवाना झाली. या प्रकारामुळे गोंदिया रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

दुसऱ्या गाड्यांना विलंबगोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर शालिमार- मुंबई एलटीटी एक्स्प्रेस (कुर्ला)मधील प्रवाशांनी बंद एसीवरून दीड तास ही गाडी रोखून धरली. त्यामुळे या फलाटवर येणाऱ्या तीन- चार गाड्या १ तास विलंबाने धावल्या, तर काही गाड्या फलाट क्रमांक १ व २ वर वळविण्यात आल्या होत्या. गाड्यांना पोहोचण्यास विलंब झाल्याने अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्याची अडचण झाली.

गाड्यांचा लेटलतीफपणा कायमहावडा- मुंबई मार्गावरील अनेक गाड्या अजूनही दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. मागील दीड महिन्यापासून ही समस्या कायम असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे; पण रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :railwayरेल्वे