शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देऊटोला बबई कालव्याजवळ आढळला महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह

By अंकुश गुंडावार | Updated: February 10, 2025 12:03 IST

घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

गोरेगाव (गोंदिया ) : तालुक्यातील देऊटोला-बबई गावालगत असलेल्या कालव्याजवळ शेतशिवारात अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. ही  घटना आज सकाळी (दि.१०) सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ६ वाजताच्या काही गावकऱ्यांना कालव्याजवळ महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. यानंतर गावकऱ्यांनी याची माहीती लगेच गोरेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. सदर महिला ही ३० ते ३५ वर्ष वयोगटातील आहे.  सदर घटना नेमकी कशी घडली. याविषयी माहिती मिळू शकली नाही. महिलेच्या शेजारी दुसऱ्या बांधीत तणसाचे ढीग जळालेले आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. महिलेला नेमके कोणी कसे आणि का जाळले हे तपासानंतरच पुढे येणार आहे. गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेच्या सुमारास घटना घडल्याचा अंदाजही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या स्थितीवरुन हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान सदर महिलेचा चेहरा व वरील भाग पुर्णपणे जळालेला आहे. त्यामुळे या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी