लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. तालुक्यातील ग्राम डव्वा येथील वळणावर रविवारी (दि.१९) दुपारी ३.१५ वाजतादरम्यान हा अपघात घडला.ट्रॅक्टर क्र मांक एमएच ३५ -एजी ०८५२ ची ट्रॉली क्र मांक एमएच ३५-एफ ४३२४ ने भेंडाळा (सिंदेवाही) येथील वऱ्हाडी खोडशिवणी येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याकरिता चालक देवेंद्र पारधी यांच्या ट्रॅक्टरने निघाले.मात्र ट्रॅक्टर व ट्रॉलीचे संतुलन बिघडल्याने ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना पोलिसांच्या मदतीने डव्वा व गोंदिया येथील रूग्णालयात हलविण्यात आले.अपघाताची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४ (ब), ६६, १९२ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे व सुरेश चंद्रिकापुरे करीत आहेत.
वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:59 IST
वऱ्हाड्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून त्यात बसलेले ३६ वऱ्हाडी जखमी झाले. तालुक्यातील ग्राम डव्वा येथील वळणावर रविवारी (दि.१९) दुपारी ३.१५ वाजतादरम्यान हा अपघात घडला.
वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला
ठळक मुद्देडव्वा- घोटी मार्गावरील घटना : ३६ वºहाडी जखमी