शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

माता-पिता हेच पहिले गुरू

By admin | Updated: August 1, 2015 02:13 IST

लोकमत युवा नेक्स्ट व एनएमडी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून

गुरूचे महत्त्व : स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट व एनएमडी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार (दि.३१) गुरूचे महत्त्व या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती मातेच्या छायाचित्राला माल्यार्पण करून झाली. अध्यक्षस्थानी डॉ. चतुर्वेदी तर अतिथी म्हणून डॉ. महाजन, प्रा.डॉ. डोमणे, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत आदी उपस्थित होते. डॉ. चतुर्वेदी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूचे योगदान आहे. जसे कुंभार मातीला आकार देवून भांडी बनवतो, तसे गुरू आपल्या शिष्याला घडवितो, असे म्हटले. प्रा. बबन मेश्राम यांनी सांगितले की, आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरूपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. गुरू पौर्णिमेला गुरूचे पूजन केले जाते, अशी माहिती सांगितली. प्रास्ताविकात दिव्या भगत यांनी लोकमत युवा नेक्स्टतर्फे वर्षभर चालणाऱ्या सामाजिक, क्रीडाविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल युवा वर्गास माहिती दिली. माता-पिता हे आपले घरातील प्रथम गुरू असतात तर शिक्षण व व्यावहारिक ज्ञानासाठी गुरू हा आपला शिक्षक असतो. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या गुरूला कधीही विसरू नये, असे सांगितले.स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात सोमेश्वर कटरे, चंद्रशेखर डहारे, भुमेश्वर सोनटक्के, त्रिलोक डहारे, कंचन राठोड, अजय मस्करे, गायत्री भेलावे, निशांत रंगारी, निकिता सविचारे, वैशाली राठोर, रागिणी डहाट, निशा अग्रवाल, नूतन खोब्रागडे, सदीस उके, तेजेश्वरी बसीने, दिपाली ठाकरे, अक्षय कारंजेकर, निशा पटले व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संचालन प्रा. बबन मेश्राम यांनी तर आभार नूतन खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लक्की भोयर, दर्पन वानखेडे, विशू डोंगरे, पारस लोणारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)