शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गराडा येथील पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:14 IST

पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले.

ठळक मुद्देगाव तिथे शाळा धोरणाचा फज्जा : गराडा शाळा बंद प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या गराडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बुधवारी (दि.३) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक शिक्षण विभागाने कुलूप लावले. याचा निषेध म्हणून पालक व गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्यामुळे शिक्षण विभागाला येथील शाळा बंद करणे चांगलेच महाग पडण्याची शक्यता आहे.मुरदोली(गराडा) चे सरपंच यांनी शिक्षण विभागाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. गराडा येथील शाळा बंद झाल्याने दोन दिवसांपासून विद्यार्थी घरीच असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये शिक्षण विभागा विरोधात रोष व्याप्त आहे.शासनाने एकीकडे गाव तिथे शाळा हा मुलमंत्र वापरुन शिक्षणापासून कुणीही वंचीत राहणार असा गाजावाजा करीत आहे. तर दुसरीकडे खेड्यापाड्यातील शाळांना कुलूप ठोकून विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचीत ठेवित असल्याचा आरोप सरपंच भगत यांनी केला आहे. गराडा हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसले असून पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेत नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो.त्यामुळे प्राथमिक शाळा गराडा इतरत्र हलवू नये, असे गावकऱ्यांचे मत आहे. मुंडीपार प्राथमिक शाळा तीन किलोमीटर आहे. त्यामुळे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शाळेत विविध सुविधागराडा येथील प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह, वीज व पाण्याची सुविधा, डिजीटल शाळा, क्षेत्रफळ सात हजार चौरस मीटर तर पाच हजार चौरस मिटर खेळाचे मैदान, वर्गखोल्या आणि शैक्षणिक साधने उपलब्ध आहेत. वाचनालयात ३०० पुस्तक, शालेय आवारात बगीचा, मुंडीपार केंद्रांतर्गत पहिली १०० टक्के प्रगत शाळा होण्याचा मान या प्राथमिक शाळेला मिळाला आहे. मात्र यानंतरही शिक्षण विभागाने ही शाळा बंद केली.