शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
4
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
5
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
6
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
7
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
8
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
9
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
10
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
11
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
13
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
14
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
15
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
16
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
17
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
18
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
19
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
20
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

आठ शेतकऱ्यांच्या शेतातून काढला पांदण रस्ता

By admin | Updated: March 10, 2017 00:37 IST

तालुक्यातील बघोली येथे सन २०१६-१७ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार

मग्रारोहयोत भ्रष्टाचार : अनेक अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांनी निवेदनगोरेगाव : तालुक्यातील बघोली येथे सन २०१६-१७ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रुपचंद पटले यांनी करुन चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, असे निवेदन आयुक्तालयापर्यंत केले. आठ शेतकऱ्यांच्या शेतातूनच विनापरवानगी पांदण रस्ता तयार करण्यात आला. त्या आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, पण त्यांना मोबदला देण्यात आला नाही. थातूरमातूर चौकशी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, अन्यथा शासनाने इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे लेखी निवेदन शेतकरी रुपचंद पटले यांनी जिल्हाधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.शेतकरी रुपचंद पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरु चन्ने, नारायण चन्ने, रामचंद पटले, देवचंद पटले, रुपचंद पटले, जाया सोनवाने, आनंदराव पटले, इंद्रराज पटले व दसाराम पटले या शेतकऱ्यांची परवानगी न घेता सरपंच, पोलीस पाटील, सचिव, रोजगार सेवक व मग्रारोहयोचे अभियंता यांनी तलाठ्याकडून नकाशात व सातबारामध्ये पांदन रस्त्याची नोंद नसताना बनावटी ढोबळ नकाशा तायर करुन सदर शेतकऱ्यांचे गट क्रं.(९२,९९,२०१, १०६, ११,११२,११३, १४५) मधून पांदन रस्ता तयार केला. तलाठ्याने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार येथे पांदण रस्त्याची नोंद नसताना जबरीने रस्ता तयार करण्यात आला. या कामावर मजुरांची खोटी नावे घालून त्यांच्या नावावर पैसा काढून मजूर कामावर आलेच नाही म्हणून ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ असे रोजगार सेवकासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याचे दिसून येते. गावातीलच अंगणवाडी मदतनीस कामावर न जाता तिचे नाव मस्टरवर होते. इकडे अंगणवाडीच्या हजेरी रजिस्टरवर तिच्या सह्या आहेत, हे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांच्या चौकशीत सिद्ध झाले. अंगणवाडी मदतनीस प्रेमकला मेश्राम यांनी दिलेल्या लेखी बयानात, मी या कामावर कधीच गेली नाही. माझ्या खात्यावर जमा झालेले सात हजार रुपये रोजगार सेवकाने मागितले व मी त्यांना ही रक्कम दिलेली आहे, असे सांगितले. असे अनेक मजूर कामावरच आले नाही, त्यांची नावे मस्टरवर आहेत. मस्टरवरील अनेक नावांनी ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’ या तत्वावर भ्रष्टाचार करण्यात आला.राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांना व आयुक्त नागपूर यांना या प्रकरणाचे निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी अर्जदारासमक्ष व्हावी. अर्जदाराला चौकशी अहवालासह न्याय मिळवून द्यावे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. दोषीवर कारवाई करुन त्यांच्याकडून मग्रोरहयोची रक्कम वसूल करावी. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या वाढत्या जमिनीचा मोबादला व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)