शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

149 केंद्रांवरून होणार यंदा धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख ५५ हजार खातेदार शेतकरी असून, यापैकी आतापर्यंत ९८ हजार शेतकऱ्यांनी सातबाराच्या आधारावर नोंदणी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची विक्री करून शेतकरी उधार-उसणवारी फेडून दिवाळ सण साजरा करतात. हलके धान आता बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ अशा एकूण १४९ धान खरेदी केंद्रांवरून ३० ऑक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी यावर्षीपासून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख ५५ हजार खातेदार शेतकरी असून, यापैकी आतापर्यंत ९८ हजार शेतकऱ्यांनी सातबाराच्या आधारावर नोंदणी केली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. तर जड धान बाजारपेठेत येण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. ३० ऑक्टोबरपासून या दोन्ही विभागाचे धान खरेदी केंद्र सुरू होण्याचे संकेत या दोन्ही विभागाने दिले आहे. गोंधळ टाळण्यासाठी प्रशिक्षण - शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदीदरम्यान कुठलाही गोंधळ निर्माण हाेऊ नये व याचा शेतकऱ्यांना फटका बसू नये, यासाठी सर्व १४९ शासकीय धान खरेदी केंद्राच्या सेवा सहकारी संंस्था आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे खरेदी केंद्रांवर धान खरेदीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ- शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन पीकपेऱ्याची नोंद करून सातबारा घेऊन शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुदत असल्याने यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा मिळणार १९४० रुपये प्रतिक्विंटल दर - शासनाने यंदा धानाचा हमीभाव निश्चित केला असून सर्वसाधारण धानाला प्रतिक्विंटल १९४० दर जाहीर केला आहे. त्यामुळे या किमतीपेक्षा कमी दराने धानाची खरेदी करता येणार नाही. यंदा बोनसची शक्यता कमीच - मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने धानाला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे हमीभाव आणि बोनस मिळून प्रतिक्विंटल २५२० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकार अडचणीत असून सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे यंदा धानाला बोनस जाहीर होण्याची शक्यता कमीच आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड