शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी गौडबंगाल कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

शासनाने यंदा जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या ७० आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ अशा एकूण ११४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. धान खरेदी केंद्राना मंजुरी देवून जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र आतापर्यंत जिल्हा मार्केटींग फेडरेशनची ५८ केंद्र सुरु झाली आहे तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राचा अद्यापही पत्ता नाही. 

ठळक मुद्देफेडरेशन म्हणते खरेदी सुरु : शेतकरी मात्र खासगी व्यापाऱ्यांच्या दारात

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  यंदा दिवाळी झाल्यानंतरही जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र बऱ्याच ठिकाणी अजुनही सुरु झाले नाही. परिणाम शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटलमागे ६०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने यंदा जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या ७० आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ अशा एकूण ११४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. धान खरेदी केंद्राना मंजुरी देवून जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र आतापर्यंत जिल्हा मार्केटींग फेडरेशनची ५८ केंद्र सुरु झाली आहे तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राचा अद्यापही पत्ता नाही. यंदा दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करावी लागली. तर अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापारी कमी दर देत असल्याने धानाची विक्री केली नाही. त्यामुळे त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजन पडले. मार्केटींग फेडरेशन ५८ धान खरेदी केंद्र सुरु झाल्याचा दावा करीत आहे. मात्र अजुनही बऱ्याच धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु झाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थीक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राचा तिढा सुटल्याची माहिती आहे. पण ही केंद्र सुरु झाली नसल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही धान खरेदी केंद्राचे गौडबंगाल कायम असल्याचे चित्र आहे. खरेदी सुरु तर ऑनलाईन नोंद का नाहीजिल्हा मार्केटींग फेडरेशनने ५८ धान खरेदी केंद्र सुरु झाले असून या केंद्रावर धान खरेदी सुरु झाली असल्याचा दावा केला आहे. नियमानुसार धान खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर दररोजच्या धान खरेदीची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापही एकाही धान खरेदी केंद्राने धान खरेदीची माहिती अपलोड केली नसल्याची माहिती आहे. ऑनलाईन सातबाराची अट मागील वर्षी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला होता. यासाठी बनावट सातबारा आणि पीक पेऱ्याच्या खोट्या नोंदी चढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा हा गैरप्रकार टाळण्यासाठी ऑनलाईन सातबारा आणि त्यावर पीक पेऱ्याची नोंद अनिवार्य करण्यात आली आहे. बोनसकडे शेतकऱ्यांचे लक्ष मागील वर्षी आघाडी सरकारने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्याच धर्तीवर यंदा सुध्दा बोनस जाहीर केला जाणार असल्याची चर्चा आहे. शासनाने मागील वर्षी एवढाच बोनस जाहीर केला तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २५६८ ते २५८८ रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड