शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात ...

ठळक मुद्देदलाल सक्रिय : वजन करण्यास विलंब, विभागाला तक्रारींची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट असून दलालामार्फत येणाऱ्या धानाचे वजन आधी आणि शेतकऱ्यांच्या धानाचे वजन नंतर केले जात असल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू केले आहे.यासाठी काही संस्थाशी खरेदीचा करार केला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी सुरू केली. टोकन पध्दतीमुळे ज्या दिवशीचे टोकन शेतकऱ्यांना दिले त्या दिवशीच शेतकरी आपले धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून जातात. यामुळे खरेदी केंद्रावर आधीच धान नेऊन ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर दलालामार्फत येणाºया धानाची आधी मोजणी केली जात असून टोकन नुसार नंबर येणाऱ्या शेतकऱ्यांना वेटींग ठेवले जात आहे. टोकनवाल्या शेतकऱ्यांच्या धानाचा काटा पंधरा पंधरा दिवस होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. असा प्रकार गुरूवारी (दि.६) गोरेगाव तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर पुढे आला.टोकननुसार दिलेल्या तारखेनुसार धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे धान न घेता दलाला मार्फत आलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची आधी मोजणी करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांने संस्थेच्या पदाधिकारी व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार केली. मात्र त्यांनी लिखीत तक्रार करा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी रब्बीतील धानाची विक्री करुन खते, बियाणे घेण्याच्या लगबगीत आहे. मात्र खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल होत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाही करु असे सांगितले.रब्बीला बोनस नाहीचशासनाने यंदा खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाला सुध्दा तो लागू राहिल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र रब्बी हंगामातील धानाला बोनस मिळणार नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड