शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

बारदाणाअभावी धान खरेदी प्रभावित

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.

देवरी : वर्षभर शेतात मेहनत करुन सुद्धा धानाची समर्थन मूल्यावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांना जीवाचा आटापीटा करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील सर्वच धान खरेदी केंद्रावर दिसून येत आहे. आदिवासी विकास महामंडळ द्वारा संचालित तालुक्यातील सर्व आधारभूत धान खरेदी केंद्रावर शासनाच्या दिरंगाईमुळे बारदाने पूर्णपणे मिळाले नसल्याने खरेदी केंद्रावर धान खरेदी पूर्णपणे बंद आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील आदिवासी विविध कार्य. संस्थेत आतापर्यंत फक्त तीन हजार ५०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदी केंद्राद्वारे सोळा हजार बारदाण्याची मागणी आदिवासी महामंडळ विभागाला केली असता त्यांनी केवळ आठ हजार बारदाने पुरवील्याचे सांगण्यात आले. सध्या बारदाने नसल्यामुळे खरेदी बंद करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांपासून बारदाने नसल्याने शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल धान उघड्यावर ठेवला असून केंद्रात कॅप कव्हरची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या घरुन चादरी व महिलांच्या साड्या आणून धानाच्या बोऱ्यांवर झाकावे लागत आहे. दुसरीकडे धान उघड्यावर असल्याने धानाची चोरी होण्याची भिती असल्याने ऐन कडकडत्या थंडित रात्रंदिवस जागून धानाची सुरक्षा करावी लागत असल्याने क्षेत्रातला शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सर्व शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजनाची मागणी करून सुद्धा अजूनपर्यंत इलेक्ट्रानिक वजन प्राप्त न झाल्याने कित्येक केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होताना दिसून येत आहे. या सर्व समस्येबाबत क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी प्रादेशिक व्यवस्थापक व महाव्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्याशी चर्चा करुन त्वरित बारदाने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)