शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
3
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
4
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
5
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
6
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
7
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
8
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
9
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
10
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
11
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
12
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
13
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
14
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
15
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
16
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
17
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
18
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
19
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
20
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

पूर्व विदर्भातील धान भरडाईचा तिढा सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम, खा. प्रफुल्ल पटेल,  वित्त विभागाचे अप्पर सचिव, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व्यवस्थापकीय संचालक, अर्थ सल्लागार व उपसचिव, मार्केटिंग फेडरेशनचे सचिव उपस्थित होते.

ठळक मुद्देमंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय : प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सोडविण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि. ११) मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धानाच्या भरडाई दरात वाढ आणि धानाचे अपग्रेड करिता १०० रुपये प्रति क्विंटल वाढवून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून पूर्व विदर्भातील धान खरेदीचा तिढा सुटणार आहे. मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम, खा. प्रफुल्ल पटेल,  वित्त विभागाचे अप्पर सचिव, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व्यवस्थापकीय संचालक, अर्थ सल्लागार व उपसचिव, मार्केटिंग फेडरेशनचे सचिव उपस्थित होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत पूर्व विदर्भात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जात आहे. मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भात १ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे तांदूळ जमा केला जातो. परंतु खरीप हंगामातील धानाच्या भरडाई दर आणि थकीत वाहतूक भाडे तसेच धानाच्या गुणवत्तेमुळे २०० रुपये प्रति क्विंटल अपग्रेड करुन देण्याची मागणी राईस मिलर्सने  केली होती. मात्र शासनाने यावर तीन महिने कुठलाच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे शासकीय धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात १ कोटी क्विंटल धान उघड्यावर व तसेच गोदामांमध्ये पडला आहे. या धानाची उचल न झाल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. याच विषयावर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत धान भरडाईचे दर ४० रुपये प्रति क्विंटल वरुन ५० रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, तसेच मागील खरीप हंगामातील धानाची गुणवत्ता योग्य नसल्याने धान भरडाई करुन नियमानुसार तांदूळ जमा करण्यासाठी प्रति क्विंटल १०० रुपये अपग्रेड वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान खरेदीचा तिढा लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

धानाचा बोनस १५ दिवसांतजिल्हा मार्केटिंग फेडरशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र बोनसची रक्कम अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या विषयावर सुध्दा मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ दिवसांत बोनसची रक्कम देण्याचे आश्वासन खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवार