शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

पदमपूर ग्रा.पं.ने दिली ७० बोगस शौचालयांची कबुली

By admin | Updated: October 6, 2016 00:59 IST

सरपंच, उपसरपंच, वर्तमान ग्रा.पं.सदस्य व माजी पदाधिकाऱ्यांनाही शौचालय देण्याचा माणस पदमपूर ग्राम पंचायतचा होता.

१५३ पैकी ८३ लाभार्थी पात्र : आशिष तलमले यांनी केली होती तक्रारओ.बी.डोंगरवार  आमगावसरपंच, उपसरपंच, वर्तमान ग्रा.पं.सदस्य व माजी पदाधिकाऱ्यांनाही शौचालय देण्याचा माणस पदमपूर ग्राम पंचायतचा होता. स्वत: व आपल्या मतदारांना बोगस लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवाने यापुर्वी लाभ घेतलेल्या ७० बोगस लोकांची नावे शौचालयाच्या यादीत टाकले. परंतु गावातीलच तरुण आशिष भुमेश्वर तलमले यांनी या प्रकरणाची आॅनलाईन तक्रार शासनाकडे केल्यामुळे मंजूर झालेल्या यादीत ७० नावे बोगस आढळली आहेत.आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथील ग्राम पंचायतने शासनातर्फे निर्मल भारत अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या शौचालयाच्या १२००० रुपये अनुदानासाठी १५३ लोकांची नावे मंजूर केली होती. शौचालयाची ज्यांना गरज आहे. त्यांना शौचालय न देता सरपंच रिता पांडुरंग पाथोडे यांनी शौचालयाच्या यादीत बोगस नावाचा समावेश केला. इतकेच नव्हे तर स्वत:च्या पतीचेही नाव यायोजनेचा लाभ घेण्यासाठी यादीत टाकले. शौचालय नसल्यास कुण्याही व्यक्तीला निवडणूक लढविता येत नाही.सरपंच महिलेने स्वत:च्या पतीने, सासऱ्याचे व गावातील माजी पदाधिकाऱ्यांचा शौचालयाचा लाभ घेणाऱ्या यादीत समावेश केला. गावातील गरीब गरजू उघड्यावर शौचास जातात. त्यांना यातून डावलण्यात आले. या प्रकाराची माहिती गावातील तरुण आशिष भुमेश्वर तलमले यांना होताच त्यांनी शासनाच्या आपले सरकार या बेबसाईटवर शौचालयात भ्रष्टाचार या खाली तक्रार नोंदविली. तक्रारीची तात्काय दखल घेण्यात आली. खंडविकास अधिकारी ग्रामपंचायत मध्ये पोहोचले. त्यांनी या यादीतून बोगस नावे वगळण्याच्या सूचना दिल्या. त्यावरुन सरपंच व सचिवाने शौचालयाच्या यादीत समाविष्ट केलेली बोगस नावे वगळण्यात आली. १५३ पैकी आता शौचालयासाठी ८३ नागरिक पात्र झाले आहेत. तर ७० लोक वगळण्यात आले आहेत. ज्यांना यापुर्वी शौचालयाचा लाभ देण्यात आला. अशा लोकांच्या नावाचा समावेश यादीत होता. परंतु एका तरुणाने घेतलेल्या या भूमिकेला गावातील इतर तरुणांनी पाठिंबा दिला. परिणामी १२००० रुपयासाठी ७० लोकांची बोगस नावे या यादीतून वगळण्यात आले. एकट्या पदमपूर मधील ७० बोगस लाभार्थ्यांना ८ लाख ४० हजार रुपये शासनाला द्यावे लागले असते. जुन्याच शौचालयाला नवीन शौचालय दाखवून ७० बोगस लाभार्थ्यांना ते पैसे देण्यात येणार होते. परंतु तलमले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शासनाचा ८ लाख ४० हजार रुपयाची बचत झाली. शौचालयाच्या यादीत बोगस नावाचा भरणा करुन शासनाची दिशाभूल करणाऱ्या सरपंच व सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्याने पुढाकार घ्यावा अशी मागणी आशिष तलमले व इतर तरुणांनी केली आहे.अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पदकोणत्याही तक्रारकर्त्याचे बयाण नोंदविण्यात येते. परंतु पदमपूर येथील शौचालयाच्या बोगस नावासंदर्भात आशिष तलमले यांनी तक्रार केली परंतु जिल्हा परिषद किंवा खंडविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारकर्त्याचे बयाण घेतले नाही. परस्पर गावाला भेट देऊन बोगस नावे कमी करण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशी बोगस लोकांची नावे असू शकतात यात शंका नाही. परंतु जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत अभियान कार्यालय यासंदर्भात उदासीन असल्याचे दिसून येते.विकास कामे ठप्प, भ्रष्टाचारात आघाडीवरपदमपूर ग्राम पंचायत मागील साडे तीन वर्षापासून विकास कामाकडे दुर्लक्ष करुन फक्त पैसा कुठून मिळेल याकडे लक्ष लागले असते. पदमपूरात ९४ हजाराच्या हिस्सा वाटणीची चर्चा घराघरात आहेत. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकाराी राजेश बागंडे भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठीपदमपूर येथे गेले असता त्यांच्या समोरही पैशाला घेऊनही सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपसात भांडत होते. या गोष्टीची चर्चा गावभर सुरू आहे.